*मूल्यांची रुजवणूक हिच संस्कारीत जीवनाची गुंतवणूक* *@)> मंगेशजी नरवाडे* (गटशिक्षणाधिकारी ). (मानवत / प्रतिनिधी.)————————आजच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, सामाजिक जबाबदारी व सुवर्तणूक यासारख्या महत्त्वाच्या मूल्यांची शालेय जीवनात फार गरज भासत आहे. हे अधोरेखित करून *शांतीलाल मुथा फाउंडेशन* व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी "मूल्यवर्धन 3.0" हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात सुरु केलेला आहे.मानवत येथील तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री मंगेशजी नरवाडे हे मार्गदर्शन करतांनी बोलत होते. यावेळी बोलतांना नरवाडे यांनी सांगितले की, बदलत्या जगात शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धनाची गरज पडत आहे. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थी समाजाचे प्रश्न सोडवणारे सकाराम दृष्टीने विचार करणारे आणि जबाबदार नागरिक बनतात. यात बंधूभाव समानता व स्वयंशिस्त यासारख्या मूल्यांचा समावेश होतो जे आजच्या समाजात खूप आवश्यक आहे. मानवत तालुक्यामधील एकूण तीन टप्प्यात संपन्न झालेल्या प्रशिक्षणात मानवत, केकरजवळा, कोल्हा, सावरगाव व मंगरूळ या केंद्रातील एकूण 430 जिल्हा परिषद, खाजगी संस्था यातील शिक्षकांनी मोठा सहभाग नोंदवला. प्रशिक्षण दरम्यान विविध जीवनमुल्यावर आधारित चर्चा, कृती आणि उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.या प्रशिक्षणाचे नियोजन व आयोजनाचे मार्गदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी निलु पवार, केंद्रप्रमुख उमाकांत हाडोळे सर निळू पवार सर, गायकवाड सर,मोकरे सर, मुळे सर यांनी केले.या प्रशिक्षणात *शांतीलाल मुथा फाउंडेशनचे दत्ता भुजबळ,* तालुका समन्वयक प्रवीण नरवाडे, बीआरसी कार्यालयाचे राजकुमार गाढे, दिगंबर गिरी, गजानन वांभुरकर, आत्माराम पाटील, देवरे,जलसिंगे यांनी सहकार्य केले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0