निवडणूक आयोगाविरोधात ठिय्या आंदोलन...* (देवळी प्रतिनिधी सम्यक नरेशराव ओंकार:-) अचानकपणे दोन तारखेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे निवडणूक आयोगाच्या आनागोंदी कारभाराविरोधात युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांचे नेतृत्वात आज नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी देवळीतील सर्व अपक्ष उमेदवार सुद्धा हजर होते.यावेळी किरण ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांनी आजपर्यंत प्रचारप्रसारावर केलेला खर्च द्यावा त्यानंतरच निवडणूक घ्यावी अशी मागणी केली. निवडणूक आयोग जनभावनेशी खेळत आहे, लोकहीताकरिता काम करणाऱ्या अपक्ष उमेदवारांना आर्थिकरित्या कमकुवत करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले.यावेळी देवळी शहरातील सर्व अपक्ष उमेदवार हजर होते.यावेळी युवा संघर्ष मोर्चा प्रणित देवळी जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री किरण ठाकरे यांचेसह प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, शेखर वानखेडे, शरद आदमने, निलेश तिडके, अजिंक्य तांबेकर, सुहास कुऱ्हाटकर, नारायण सुरकार, दिपक तराळे, मयूर शेंडे, गौरव खोपाळ, प्रविण खाडे, सचिन वैद्य, महिला उमेदवार भारती परतपुरे, शुभांगी परतेकी, स्वाती खाडे, शितल आदमने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0