मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूजन्य व अंमलीपदार्थ मुक्त अभियान राबवा -जिल्हाधिकारी वान्मथी सी.वर्धा, दि.30 (जिमाका) : बाल वयापासून मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण व मानसिक आरोग्य कार्यक्रम शिक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभागाने संयुक्तपणे राबवावा. जिल्ह्याला तंबाखु व नशामुक्त करण्यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती अभियान राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीचा आढावा घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, उपशिक्षणाधिकारी एम.पानसरे, पोलिस निरिक्षक सलाम कुरेशी, डॉ. मोहिता कोडापे, डॉ. माधुरी निमसटकर, डॉ. शमा खान, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलूजा आदी उपस्थित होते.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वाढत्या व्यसनाधीनतेबरोबरच अंमली पदार्थाचे वाढते प्रमाण लक्षात घेता शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य तसेच अंमली पदार्थाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कसे होतात, बाल वयातच मुलांना व्यसनाची सवय कशी लागते आणि त्यांना या व्यसनापासुन दूर ठेवण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्याच्याही सूचना यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्यात. बैठकीला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम चमू व मानसिक आरोग्य विभागाची चमू उपस्थित होती..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूजन्य व अंमलीपदार्थ मुक्त अभियान राबवा                                        
Previous Post Next Post