ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा हॉकी टीमकडून नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा सत्कार... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि. 31: नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवून नवनियुक्त नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा हॉकी टीमच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन झालेला हा सत्कार शहरातील क्रीडा संस्कृतीला बळ देणारा ठरला. या वेळी टीमचे नितीन खैरकर, मारोती तुराणकर, लोकेश उमाटे, किशोर डांगे, अभय गेटमे, प्रमोद टाले, अरुण झाडे, निलेश भगत, उमेश मीठ्ठावार, सुशांत मिलमीले, अमोल शेरकी, विकास बेताल, भूषण सोरते, सचिन महाजन उपस्थित होते. नगराध्यक्षांनी आभार मानत खेळाडूंना सुविधा व प्रोत्साहन देण्यासाठी भद्रावती नगर परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक सहकार्य राहील, असे सांगितले.यावेळी उपस्थित खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रातून घडलेले नेतृत्व शहरातील तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. भद्रावतीतील खेळाडूंना सरावासाठी आवश्यक मैदाने, क्रीडा साहित्य व स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून दिल्यास अनेक खेळाडू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हा सन्मान केवळ सत्कार नसून शहरातील क्रीडा चळवळीला नवे बळ देणारा ठरले आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा हॉकी टीमकडून नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा सत्कार...                                                            
Previous Post Next Post