महाराष्ट्र पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय, आडगाव, नाशिक पिन 422003दुरध्वनी नंबर 0253-2309700E.Mail-sp.nashik.r@mahapolice.gov.in. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. दिनांक :- ०९/१२/२०२५दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी शिवारात अवैधरित्या गांजाची विक्री करणारे इसमावरस्थानिक गुन्हे शाखेचा छापा ५० किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्तनाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी आदेशीत केल्याप्रमाणे,जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वरकारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचेपथकाने दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारे इसमावर छापाटाकून कारवाई केली आहे.दिनांक ०८/१२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांनामिळालेल्या गुप्त बातमीनुसार, दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी पाडा, पोस्ट कोचरगाव परिसरात परिसरातएक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.त्याप्रमाणे स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून, अंमली पदार्थगांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे चंदर नामदेव भरसट, रा. मु. तिल्लोळी, पो. कोचरगाव, ता.दिंडोरी, जि. नाशिक यास ताब्यात घेवून त्याचे कब्जातून १०,०२,६००/- रू. किं. चा ५० किलो १३०ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवीमनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करतांना मिळुनआला असुन त्याचेविरूध्द दिंडोरी पोलीस ठाणेस एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब), ।। (ब)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इसम हा अंमली पदार्थ गांजाची साठवणुक करून विक्रीकरत असल्याचे उघडकीस आलेले असून सदरचा गांजा हा कोठून आणला आणि कोणास विक्री करणारहोता, याबाबत पोलीस पथक कसोशिने तपास करीत आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिकग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकश्री. रविंद्र मगर, पोउनि सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टिळे, संदिप नागपुरे, आबा पिसाळ,माधव साळी, श्रीकांत गारूंगे, इम्रान पटेल, रविंद्र गवळी, मपोहवा ललिता शिरसाठ यांचे पथकाने वरीलप्रमाणे कारवाई केली आहे.

महाराष्ट्र पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय, आडगाव, नाशिक पिन 422003दुरध्वनी नंबर 0253-2309700E.Mail-sp.nashik.r@mahapolice.gov.in.          स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.                                     
Previous Post Next Post