**प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच चंद्रपूर तर्फे सत्यशोधक मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वरोरा येथे साहित्य वाटप* . (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.9 वरोरा ः ज्ञानज्योत बहुउद्देशीय संस्था नांदगाव बोर. द्वारा संचालित सत्यशोधक मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वरोरा येथे दिनांक 7//12/ 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून प्रबोधन युवा विचार मंच आणि युवा मंच चंद्रपूर यांची कडून सत्यशोधक मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहात साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये विद्यार्थिनींना पिण्याच्या पाण्याकरिता बॉटल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. विनोद सोनटक्के सर युवा विचार मंच आणि युवा मंच चंद्रपूर ते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पंकज जिवने सर मॅनेजर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चंद्रपूर आणि त्यांची पत्नी सौ. सुवर्णां मॅडम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपटकर मॅडम अधीक्षिका यांनी केले प्रास्ताविक सौ. दिपा पाटील संस्था अध्यक्षा यांनी केले. वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनी व कर्मचारी श्री महेश निमसटकर उपस्थित होते. श्री पंकज जिवने मॅनेजर भारतीय स्टेट बँक चंद्रपूर यांनी बँकेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच श्री. विनोद सोनटक्के यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रिकबचंद पाटील यांनी केले.

प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच चंद्रपूर तर्फे सत्यशोधक मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वरोरा येथे साहित्य वाटप* .                                                                         
Previous Post Next Post