*धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने शोधुन बाहेर काढला**_मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जि.अकोला या टिमचे साहसी कार्य_* ▶️ *कारंजा लाड पोलीसांना नातेवाईकांकडून मीळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी कीनखेड ता.कारंजा जि.वाशिम येथील बाळु पुंडलीक पवार वय अं.40 वर्ष* यांची कीनखेड शिवारातील धरणाच्या काठावर चप्पल,मोबाईल, चष्मा आढळून आल्याने बाळु पवार हे धरणात बुडाल्याची दाट शक्यता होती रात्री स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही शेवटी रात्री कारंजा पोलीस ठाण्याचे एएसआय जाधव साहेब आणी महेंद्र गाढवे आणी कीनखेड सरपंच निळकंठ सोनोने,सिंहासन जाधव, महादेव तांदळे, यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले रात्री उशीर झाल्याने अंधार असल्यानेच 7 डिसेंबर रोजी सकाळी आपले सहकारी मयूर साळेदार,अतुल उमाळे,विष्णू केवट,शेखर केवट, गोपाल गिरे,अपुर्व चेके, अश्विन केवट,अजय डाके,ऋषिकेश मांगाडे, संजू पाटील,हर्षल वानखडे,विकास सदांशिव, यांना घटनास्थळी रवाना केले आणी घटना स्थळी पोहचताच एपिआय मुकुंद जाधव सर यांचे आदेशाने सर्च ऑपरेशन चालु केले असता 25 फुट खोल पाण्यातुन एका तासातच सकाळी 11:30 वाजता धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलीसांचे ताब्यात दिला.यावेळी घटनास्थळावर उपस्थित कारंजा पोलीस ठाण्याचे एपिआय मुकुंद जाधव सर,पोलीस कर्मचारी खोलेश्वर खुपसे साहेब,आशिष खांडरे साहेब, प्रफुल गावंडे साहेब,आणी पो.पा. सरपंच निळकंठ सोनोने,यांचेसह गावातील नागरीक व नातेवाईक हजर होते.यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणी तत्परतेचे कौतुक केले आहे.

धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह  संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने शोधुन बाहेर काढला**_मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जि.अकोला या टिमचे साहसी कार्य_*   
Previous Post Next Post