डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या परिनिर्वाण दिनी "एक वही - एक पेन" अभियान घेऊन अनोखे अभिवादन.. (भद्रावती चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महेश निमसटकर) भद्रावती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ व्या परिनिर्वाण दिनी भद्रावती शहरांमधील स्थानिक एनजिओ 'हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती' यांच्या वतीने दि. ०६ डिसेंबर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना बस स्टॉप, भद्रावती येथे "एक वही, एक पेन" हा उपक्रम राबवून बाबासाहेबांचा कार्यास आणि स्मृतीस अभिवादन करण्यात आले.महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि.6:- शहरांमधील जनतेने व आंबेडकरी अनुयायांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणात वह्या आणि पेनी दान स्वरूपात स्वीकारण्यात आल्या. जमा झालेले वही आणि पेन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत गावाखेड्यात-घरोघरात पोहोचून वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमा मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक छोटीशी मदत तर होणारच आहे शिवाय त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव व्हावी व बाबासाहेबांसारखे विद्यार्थी तयार व्हावे, हा हेतू हेल्पिंग हँड्स एनजीओ चा या उपक्रमामागे आहे. "एक वही एक पेन" या उपक्रमाला हेल्पिंग हँड्स एनजीओ भद्रावती मधील सतत योगदान व सहकार्य करणारे कृतांत सहारे, वैभव रामटेके, राजरतन पेटकर, सोनू सिंग, प्रशांत सातपुते, सागर निरंजने, वैभव पाटील, प्रणय कांबळे, स्नेहा सातपुते, सुकेशनी मानकर, किरण कवाडे, सोनल उमाटे, प्राची वेल्हेकार, अनिकेत बांबोडे, रीता सहारे, मनोज पेटकर, वैभव मानकर, तुषार दुर्गे, पंकज शेंडे, आदर्श मेश्राम, भाग्यश्री शेंडे, सोनू सिंग, संकेत चीमुरकर, स्वप्निल बनकर, हर्षदा हिरादेवे, दीपक कावटे, जया सपाटे, पवन दासलवार, स्वप्निल मत्ते, अंकित तोडे, कैश शेख, निखिल उंबरकर, श्वेता उंबरकर, आशिष मल्लेलवार व इतर सर्वांनी मोलाचे योगदान दिले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0