विद्यार्थ्यांनी दीपज्योत लावून महामानव,बाबासाहेबांना केले अभिवादन. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे,अभ्यासिका व वाचनालयात विद्यार्थ्यांनी,दीपज्योत लावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त, अभिवादन केले.भारतरत्न,बोधिसत्व, परमपूज्य ,दीनदलिताचे कैवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त, डॉ अण्णा भाऊ साठे,अभ्यासिका वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती जकोजी एडकेवार,व समिती तर्फे अभिवादन कार्यक्रम संध्याकाळी 6:00 वाजता, आयोजित करण्यात आले,यावेळी उपस्थित वाचनालयाचे सचिव राजू भूमाजी अंजनीकर,व सहसचिव दीपक एडकेवार,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी, प्रेरणादायी विचार मांडले, व 500 वर्षाची गुलामी 50 वर्षात बाबासाहेब आंबेडकर यांनी,कसे संपुष्टात आणले.याविषयी विद्यार्थ्यांना पत्रकार मारोती एडकेवार यांनी मार्गदर्शन केले.एक विद्यार्थी व एक दीपज्योत लावून अभिवादन करण्यात आले.व छोट्या चिमुकले सर्व विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या विषयी डिजिटल टीव्ही च्या माध्यमातून,6 डिसेंबर 1956 ची चित्र ग्राफी दाखवण्यात आले.बाबासाहेबांना अभिवादन करून बाबासाहेबांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असे वाचनालयाचे सचिव राजू भूमाजी अंजनीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी दीपज्योत लावून महामानव,बाबासाहेबांना केले अभिवादन.                                                                          
Previous Post Next Post