मुस्लिम धर्मियांचा (उमुमी जोड) इज्तेमा हिप्परगा थडी, येथे उत्साहात साजरा. (.मारोती एडकेवार जिल्हा :प्रतिनिधी नांदेड) नांदेड :बिलोली तालुक्यातील हिप्पारगा थडी, येथे मुस्लिम धर्मियांचा (उमुमी जोड )इज्तेमा 7/12/25 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला, यात बिलोली व देगलूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते, कुराण व मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी मल्लवी यांनी महत्त्वाचे मुद्दे, व मुस्लिम समाजाने आपण आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे वागावे जन्नत परमा करण्यासाठी आपणासाठी, काय काय करावे यांचे संपूर्ण मार्गदर्शन हिप्पारगा थडी,येथील मुस्लिम समाजांना लाभली आहे.प्रत्येक मानवाला धर्माचे आवश्यकता असून धर्माचे नियम व पालन काटेकोरपणे जर केले तर त्या मानवाला आल्हा जन्नत मध्ये जागा देऊ शकते असे, मुस्लिम समाजातील तरुणांनी प्रामाणिकपणे आपल्या व्यवहारात वागावे, व निर्व्यसनी व्हावे आणि आपली, व आपल्या समाजाची उन्नती करावी. अशा मुद्द्यांनी मुस्लिम समाजाचे मौलवी यांचे, मार्गदर्शन झाले. या इस्तेमासाठी, हिप्परगा थडी येथील मुस्लिम समाजाचे नवयुवक तरुण, टिपू सुलतान बॉईज हिप्परगा थडी, व डॉ. एपीजे अब्दुल कलाम मित्रमंडळाच्या वतीने, पुढाकार घेण्यात आले, बिलोली तालुक्यातील व मुस्लिम समाज हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होता हा कार्यक्रम सकाळी 11:00वाजल्यापासून ते संध्याकाळी 9:00 वाजेपर्यंत नमाज पठण करून कार्यक्रम संपन्नता झाली,यावेळी कार्यक्रमांमध्ये आलेल्या तमाम मुस्लिम बांधवांना जेवणाची व्यवस्था सुद्धा ही हिप्पारगा थडी येथील मुस्लिम समाज बांधवांनी केली, बिलोली तालुक्याचा उम्मीजोड इज्तेमा म्हणून याची ओळख निर्माण झाली, इज्तेमा तिसरा वेळेस हिप्पारगा थडी येते मोठ्या उत्साहात साजरा झाला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0