*भुसावळ येथे संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यक्रम; निलकंठ तायडे रावेर तालुका अध्यक्षपदी नियुक्त* भुसावळ (जि. जळगाव) : संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भुसावळ शहरातील नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमास संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व जिल्हा अध्यक्ष सुनील जवरे, उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र महाले, भुसावळ तालुका अध्यक्ष जयंत शिंपी, भुसावळ शहर अध्यक्ष विनोद पवार, यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात भीमशक्ती सामाजिक संघटना रावेर तालुका अध्यक्षपदी निलकंठ तायडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी त्यांच्या नियुक्तीपत्राचे वितरण प्रदेश सरचिटणीस सुधीर भाऊ जंजाळे आणि जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ जवरे यांच्या हस्ते करण्यात आले.नवीन तालुका अध्यक्ष म्हणून नेमणुकीबद्दल तायडे यांचे संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या आगामी सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
byमीडीया पोलीस टाईम
-
0