निंभोरा पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या एपीआय मीरा देशमुख यांचा पत्रकार संघाकडून सत्कार*. ( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )नुकतेच निंभोरा पोलिस ठाण्यात रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) मीरा देशमुख मॅडम यांचा महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने औपचारिक सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने एपीआय मीरा देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि जनतेशी सौहार्दपूर्ण वागणूक हीच आपल्या कामाची ओळख राहील, असा विश्वास पत्रकार संघाने व्यक्त केला.सत्काराला उत्तर देताना एपीआय मीरा देशमुख मॅडम यांनी पत्रकार संघाचे आभार मानत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण सदैव तत्पर राहू, असे सांगितले. पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्यात समन्वय राखून समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद ( शिवा ) कोळी, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष अनिल आसेकर, रावेर तालुका अध्यक्ष विजय शामराव अवसरमल, कार्याध्यक्ष विनायक जहुरे, जितु इंगळे.दिलीप सोनवणे, श्रीराम पाटील, विजय अवसरमल,मनोहर कोळी, विनोद कोळी, सलमान खान उपस्थित होते

निंभोरा पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या एपीआय मीरा देशमुख यांचा पत्रकार संघाकडून सत्कार*.                            
Previous Post Next Post