*नागपूर विभाग स्तरीय युवा महोत्सवात कलासंस्कार थियेटर आर्टच्या कलाकारांचे सुयश* (विदर्भ विभागीय संपादक अब्दुलकदीर ,)भंडारा:- विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर च्या वतीने नुकत्याच विभागीय युवा महोत्सव २०२५-२६ ला पूजा सेलिब्रेशन भंडारा येथे आयोजीत करण्यात आला होता. त्यात नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन विभागीय स्तरावर सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये समूह लोकनृत्य स्पर्धेत कलासंस्कार थियेटर आर्ट भंडारा च्या कलाकारांनी अप्रतिम लोकनृत्याचे सादरीकरण करून विभागावर तृतीय क्रमांक मिळवला व भंडारा जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. त्यात मुख्य भूमिकेत शरद धोतरे, गायक विशाल जाखमाते, तुषार उके, तन्मय तितीरमारे, अनुष्का चव्हाण, कशीस हमने, प्रियांशी कांबळे, पिऊष गवरे, साहिल डोरले, आलोक लोहबरे, शुभम देव्हारे, अमन अतकरी इत्यादी युवकांनी रंगारंग कार्यक्रमाची प्रस्तुती सादर केली होती. कलाकारांनी आपल्या यशाचे श्रेय कलासंस्कार थिएटर आर्ट भंडारा चे सुरेन्द्र कुलरकर, जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाडे, क्रीडा अधिकारी स्नेहल चौगुले, आकाश गायकवाड, अविनाश निंबार्ते, सूरज लेंडे यांना दिले आहे. कलासंस्कार थेटर आर्ट च्या कलाकारांनी भंडारा जिल्हयाचे नाव लौकिक केल्याबद्दल युवक बिरादरी च्या अध्यक्षा सरिता फुंडे, वर्षा मनोज दाढी, विलास केजरकर, समीर नवाज यांच्यासह जिल्हयातील अनेक चाहत्यानी सर्वत्र कौतुक केले आहे. तसेच पुढील स्पर्धेत प्रगती व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नागपूर विभाग स्तरीय युवा महोत्सवात कलासंस्कार थियेटर आर्टच्या कलाकारांचे सुयश*                                      
Previous Post Next Post