चोपडा तहसीलदारांना भीम आर्मीच्या वतीने निवेदनघरकुलासाठी शासनाच्या रिक्त जागेचे वाटप करण्याची मागणी. (चोपडा विभागीय उपसंपादक संजीव शिरसाठ) ग्रामपंचायत कठोरा (ता. चोपडा) हद्दीतील शासनाच्या मालकीची रिक्त जमीन गरजू, आदिवासी, बेघर व भूमिहीन कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी तातडीने वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे चोपडा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.हे निवेदन मुबारक तडवी, तालुकाध्यक्ष, भीम आर्मी भारत एकता मिशन, चोपडा व राहुल जयकर, प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा) यांनी दिले. यापूर्वी 29 ऑक्टोबर 2025 रोजीही अशाच आशयाचे निवेदन देण्यात आले होते; तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीने जागावाटप प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित असताना ग्रामपंचायत कठोरा येथे अनावश्यक विलंब केला जात आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना घरकुल योजनेंतर्गत जागा मिळण्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून, शासनाने दुर्बल घटकांसाठी केलेल्या तरतुदींचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.तत्काळ कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती कार्यालय, चोपडा येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. उपोषणामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी ग्रामसेवक सौ. मनीषा महाजन, सरपंच एकनाथ कोळी, तसेच ग्रामपंचायत कठोरा येथील सर्व पंच सदस्य जबाबदार राहतील, असेही नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), गटविकास अधिकारी (चोपडा), तहसीलदार (चोपडा) व पोलीस निरीक्षक (चोपडा) यांना पाठवण्यात आल्या आहेत.निवेदन देताना मुबारक तडवी यांच्यासह शहराध्यक्ष मोसीम तडवी, कार्यकर्ते अविनाश साळुंखे आदी उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0