*पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जाता जाता केल्या १० ठाणेदारांच्या बदल्या*. (वर्धा:- प्रतिनिधी (मोहम्मद दानिश ) पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची काल सोमवारी नागपूरला बदली झाली. मात्र या शेवटच्या दिवशी त्यांनी एक महत्वाची फाईल हातावेगळी केली. ही फाईल काही ठाणेदारांच्या बदल्यांची आहे.महाराष्ट पोलीस अधिनियम अंतर्गत जिल्हा आस्थापना मंडळास अधिकार प्राप्त असतात. निःशस्त्र पोलीस पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस हे नव्याने घटकात हजर झाले असल्याने त्यांची घटकांतर्गत प्रशासकीय कारणास्तव व विनंतीने प्रशासकीयदृष्ट्या पुढील आदेशापर्यंत नेमणूक करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांची सेलू ठाणेदार म्हणून बदली झाली आहे. तर सेलूचे ठाणेदार मनोज गभणे यांना आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळाली आहे. वर्धा नियंत्रण कक्षातील अनिल मेश्राम यांना वर्धा पोलीस शहर ठाण्यात गुन्हे शाखा देण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेतील यशवंत कदम यांना दहेगाव येथील ठाणेदार म्हणून नियुक्ती मिळाली आहे. कारंजा येथील ठाणेदार नागेशकुमार चतारकर यांना सेवाग्रामचे ठाणेदार करण्यात आले आहे. वर्धा नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांना जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक व दहेगाव येथील ठाणेदार प्रल्हाद मदन यांना कारंजा ठाणेदार म्हणून नियुक्ती मिळाली.सहाय्यक पोलीस निरीक्षक व सेवाग्रामचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना वर्धा नियंत्रण कक्षात सायबर ठाणे देण्यात आले आहे. जिल्हा विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकूर यांना वर्धा स्थानिक गुन्हे शाखा देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील एनडीपीएस पथक मिळाले आहे.प्रशासकीय सोयीचा भाग म्हणून या बदल्या आहेत. पालिका निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने त्या बदल्या थांबल्या होत्या. आता आचार संहिता निर्बंध उठल्याने त्या मार्गी लागल्या असल्याचे सांगण्यात आले. वरील सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नवीन नेमणूकीच्या ठिकाणी त्वरित रुजू होण्याचे निर्देश आहेत. कारंजा घाडगे येथील मादक पदार्थ उत्पादन कारखाना उजेडात आल्यानंतर तेथील ठाणेदारांना वर्धा मुख्यालयी पाठविण्यात आले होते. आता त्या ठिकाणी पण नव्या ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण या दहा बदल्या झाल्या आहेत. तर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना नागपूर येथे नियुक्ती मिळाली आहे. नवे पोलीस अधीक्षक लवकरच रुजू होण्याची शक्यता व्यक्त होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0