जातीवाचक शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला: तेल्हारा शहरात ३२ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बेलखेड येथील नरेश सीताराम पालीवाल (४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता फटाके फोडण्यास हटकले असता आरोपीने जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करत हात पकडून लोटल्याचा आरोप आहे. आरोपी पळून गेला असून, या प्रकरणी तेल्हारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज २३ डिसेंबर रोजी दिली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0