श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय 'करियर मार्गदर्शन कक्ष' अंतर्गत करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन. (*जळगाव सानिया तडवी*) श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालया अंतर्गत सौ. कमलाबाई माध्यमिक शाळा , रावेर याठिकाणी मुलींना भविष्यातील करियरच्या संधी व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना बॅंकिंग , व्यवस्थापन, स्पर्धा परीक्षेची तैयारी इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सत्यशील धनले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे नियोजन कसे करावे यासंदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. नीता जाधव यांनी विद्यार्थिनींना ‘करिअरच्या विविध संधी व आव्हाने’ यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ.स्वाती राजकुंडल यांनी ‘अर्थशास्त्रातील विविध संधी’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले कॉमर्स विभागाचे प्रमुख प्रा. सागर महाजन यांनी विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधला तसेच प्रा. तेजस दसनूरकर यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलाबाई माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीलम पुराणिक तसेच सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पंकज पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री नितीन खरे यांनी केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0