आमदार समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी* हिंगणघाट, दिनांक २५ डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रम आज दि.२५ रोजी आमदार कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. उपरोक्त कार्यक्रमास आमदार समीर कुणावार यांच्यासह नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. नयना उमेश तुळसकर, प्रा. डॉ. उमेश तुळसकर, जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक भूषण पिसे, समुद्रपूर येथील माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, मंडळ अध्यक्ष शेषराव तुळणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या राष्ट्रहिताच्या, लोककल्याणकारी व प्रेरणादायी कार्यास अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी अटलबिहारी वाजपेयी यांचे देशाप्रती मोठे योगदान असून त्यांचे राजकीय जिवन हे भारतीय राजकारणात मैलाचा दगड ठरला असल्याचे मनोगत आ कुणावार यांनी व्यक्त केले. उपरोक्त कार्यक्रमास माजी नगरसेवक मारोती साठे हिंगणघाट शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक विक्रांत भगत, वामन मावळे, कमलेश उर्फ बंटी वाघमारे, राजू कामडी, रवींद्र रोहनकर, मनीष धानुलकर, रोहित हांडे, नरेश युवनाथे, धनंजय बकाने , दिनेश वर्मा, संजय माडे, सौरभ पांडे, अतुल नंदागवळी, निलेश ठोंबरे , सुदर्शन उर्फ सोनू गवळी, नवनिर्वाचित नगरसेविका अनिता मावळे, मंदा राऊत, पल्लवी बाराहाते, वैशाली काळे, सोनू कुबडे, दुर्गा चौधरी, वंदना मैंद , शितल मोहता, जयाताई बसंतानी, रवीला आखाडे , प्रतिभा पडोळे, मंगला कुमरे, प्राची प्रसाद पाचखेडे, अश्विनी मानेकर इत्यादी नगरसेवक व नगरसेविका सोबतच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0