चोपडा ( संजीव शिरसाठ)– गोमाता सनातन हिंदू धर्माचा प्राण आहे. देशात गोमातेसाठी सन्मान दिवस २७ एप्रिल असेल, गो-हत्या बंदीसाठी नरेंद्र मोदी सरकारने संसदेचा वेगळा कायदा करण्याची गरज आहे असे प्रतिपादन परमपूज्य जगदीश गोपाल आनंद जी महाराज यांनी येथे केले. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भव्य गौ कृपा कथा आयोजित करण्यात आली असून या कथे दरम्यान परम पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती जी यांचे गुरुदेव या ठिकाणी आज आले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीत व वाजंत्री च्या निनादात गुरुदेवांचे व्यासपीठावर आगमन झाले. कथावाचक दीदी देखील खाली बसल्या व त्यांनी गुरुदेवांना ऐकले. स्वातंत्र्यानंतर गांधी नेहरू यांनी सांगितले होते की आम्ही या देशात गोहत्या बंदी करू त्यांच्यानेही झाले नाही? २०१२ पासून देशात नरेंद्र मोदींचे सरकार आले २०२५ पर्यंत त्यांनी देखील गोहत्या बंदीचा कायदा केला नाही? देशातील ऋषीमुनींची तपस्वींची मागणी आहे भारतात रोज हजारो गाईंची कत्तल होते आहे. काश्मीरची ३७० कलम हटविण्यात आले, तीन तलाक कायदा मंजूर झाला, डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस देखील भारताला घाबरतो मग या राजकारण्यांना कायदा करायला काय अडचण आहे असे प्रतिपादनही गुरुदेवांनी केले. आपल्या क्रांतिकारी वाणीने गुरुदेवांनी गो पालनाचे महत्त्व यावेळी विशद केले.२७ एप्रिल रोजी आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने सरकारला निवेदन द्यावे प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची निवेदन दिले गेले पाहिजे तरच गोहत्या बंदी कायदा होईल असेही गुरुदेवांनी यावेळी सांगितले व श्रोत्यांना शपथ दिली. साध्वी कपिला गोपाल दीदी यांनी राजा दिलीप ची कथा सांगितली व गाईपासून संतान उत्पत्तीचा मंत्र देखील श्रोत्यांना दिला. कामधेनू गो सेवक समूहाने आज व्यासपीठावरच दीदींचा वाढदिवस साजरा केला. चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ पंढरीनाथ पाटील, दादाजी दरबार चे धनराज नाना, मनीलाल पटेल, नंदलाल प्रताप पाटील यांनी सपत्नीक आरती केली. कथेचे सूत्रसंचालन कवी रमेश पाटील यांनी केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0