आम आदमी पार्टी अकोला महानगर पालिकेच्या सर्व प्रभागात महानगर अध्यक्ष हाजी मसुद अहेमद खान यांच्या नेतृत्वात लढणार*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला दि. १८/१२/२०२५ अकोला महानगर पालिकेच्या सर्वच प्रभागात आम आदमी पार्टी आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती, आजच्या पत्रकार परिष्क्षदेत आम आदमी पक्षाचे महानगर अध्यक्ष श्री मसुद अहेमद खान यांनी दिले आहे.भा.ज.पा व कॉग्रेस. यांचे साठगाठीमुळे भरमसाठ मनपा कर रद्द करणे, व नविन कर कमीत कमी दरात लावुन देणे, दर्जेदार शिक्षा, प्रत्येक प्रभागात ओ.पी.डी. हॉस्पीटल उभारणे, दररोज शुध्द पाणी, या मुलभुत सुविधा उपलब्ध तसेच प्रत्येक प्रभागात जिम स्थापित करणे व हेल्पलाईन सेन्टर उभारणे शहराचे रस्ते सौंदर्यकरण करणे व दररोज साफसफाई करणे, तसेच सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना बिन व्याजी एक लाखपर्यंत कर्ज मिळवुन देणे इत्यादि त्याच प्रमाणे स्वच्छ व पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त शासन शहराला देवून अकोला शहराला भ्रष्टाराच्या अजगरी विळख्यातुन मुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. शहराला नियमित, स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, नगर परिषदेच्या काळात स्थापन झालेल्या शाळांची अवस्था आज बकाल झाली आहे. कचऱ्याचे प्रचंड ढिगार साचले आहेत, काहीं ठिकाणी रस्त्यावर दिवे नाहीत, डुकरांचे व कुत्र्यांचे साम्राज्य जिकडे-तिकडे पसरलेले आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगर पालिकेत सगडीकडे "कमिशनराज" निर्माण झाला आहे, या करिता फक्त भा.ज.प. व कॉग्रेस सरकार जबाबदार आहेत. या सर्व बाबींवर उपाय म्हणुन आम आदमी पार्टी सत्ता स्थापन झाल्यानंतर काम करणार आहे. आम आदमी पार्टी तर्फे जनतेला आव्हान करण्यात येते की, इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी नं. ९०२८४२५४५८ या नंबरवर संपर्क साधावा.दिल्ली व पंजाब मॉडेल अकोल्यात आणुन जागतिक दर्जा सोयी, सुविध, शिक्षण आणि आरोग्य, विज पाणी व रस्ते, जनतेच्या आरोग्य आणि विश्वासाची हमी देवून आम आदमी पार्टी अकोला महानगरातील सर्वच प्रभागातुन आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. इच्छुक उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येत असल्याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली व जनतेला तसे आवाहन आम आदमी पक्षा कडुन करण्यात आले. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे उपाध्यक्ष श्री वसंतरावजी ढोके, राज्य कार्यकारीणी सहसचिव श्री अरविंद कांबळे, श्री ज्ञानेश्वर साकरकर, जिल्हाध्यक्ष श्री कैलाश प्रांजले, प्रा. विजय ठाकरे सर, गजानन बुडुकले, प्रा. प्रदिप गवई, आकीब खान, श्री अशोक शेगोकार, श्री श्रावण रंगारी आदी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आम आदमी पार्टी अकोला महानगर पालिकेच्या सर्व प्रभागात महानगर अध्यक्ष हाजी मसुद अहेमद खान यांच्या नेतृत्वात लढणार*.                                                                           
Previous Post Next Post