नियोजन भवन, सदर, नागपूर येथे १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक दिवस साजरा ____________________महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी पोलीस अधिकारी डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री मोईन मलक, श्री गुरमित सिंग खोखर, श्री परहीज गिमी, फादर रणजित रॉग्डिज, श्री निखील कुसुमागर यांच्यासह प्रशासन व पोलीस विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी “विविधतेत एकता” या विषयावर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमातून सामाजिक सलोखा, समावेशकता आणि घटनात्मक मूल्यांचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला...मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0