श्री. साई प्रतिष्ठान हिंगणघाट येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबीर उत्साहात*. हिंगणघाट : श्री. साई प्रतिष्ठान, नंदोरी रोड हिंगणघाट येथे श्री. संत साई बाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिन व संत लक्ष्मी माता पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने नि:शुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबीर घेण्यात आले. आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिरात सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी हॉस्पिटल मधिल तज्ञ डॉक्टरांची चमू यांचे सहकार्य लाभले. यावेळी जनरल मेडिसिन, सर्जरी, स्त्री रोग व प्रसुती तपासणी, बाल रोग तपासणी, अस्थी रोग तपासणी, कान, नाक व घसा तपासणी, कर्क रोग तपासणी, दंत चिकित्सा तपासणी, नेत्र चिकित्सा तपासणी, न्युरो सर्जरी या सर्व आजारावर तज्ञ डॉक्टराकडून सल्ला व तपासणी करण्यात आली. या महाशिबिरात शहरातील पाचशे पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.यावेळी श्री. साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर महाराज, सचिव अतुल वांदिले यांच्यासह साई सेवा समितीचे पदाधिकारी, साईसेवक व साईसेविका उपस्थित होते.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0