प्रभाग क्रंमाक १२ मधीन भाजपा च्या वृषाली पांढरे एका मताने तर काँग्रेसचे अनिल पडोळे तीन मताने विजयी.. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.24:- नुकत्याच जाहीर झालेल्या भद्रावती नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल निकालात प्रभाग क्रंमाक १२ ब मधून भाजपाच्या वृषाली पांढरे या महिला उमेदवार केवळ एका मताने तर याच प्रभागातील अ गटातुन काँग्रसचे अनिल पडोळे केवळ तीन मताने विजय झाले. एकूण १४ प्रभाग असलेल्या भद्रावती नगर परिषदेच्या प्रभाग क्रं.१२ ने मात्र भद्रावतीकरांना चांगलीच चपराक दिली.त्यात अ गटातून काॅंग्रेसचे अनिल पडोळे हे केवळ ३ मतांनी निवडून आले.त्यांना ७९४ मते मिळाली.तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश कटलावार यांना ७९१ मते मिळाली. तसेच ब गटातून भाजपाच्या वृषाली पांढरे ह्या केवळ एका मताने विजयी झाल्या. त्यांना ७०८ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काॅंग्रेसच्या कल्पना मत्ते यांना ७०७ मते मिळाली.

प्रभाग क्रंमाक १२ मधीन भाजपा च्या  वृषाली पांढरे एका मताने तर    काँग्रेसचे अनिल पडोळे तीन मताने विजयी
Previous Post Next Post