*आदिवासी माना जमातीचा उपवर-वधू परिचय मेळावा यंदा १ फेब्रुवारी रोजी*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.२३:- येथील माना जमात वधू-वर सूचक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आदिवासी माना जमातीचा राष्ट्रीय उपवर-वधू परिचय मेळावा यंदा दि.३१ जानेवारी २०२५ आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी येथील श्रीराम नगरातील ग्रामीण रुग्णालयाजवळील माणिकादेवी मंदिराच्या भव्य पटांगणावर पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्याची सुरूवात दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या महिलांच्या विविध स्पर्धांनी होणार आहे. त्यानंतर ६ वाजता हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडणार आहे. ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. तर दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उपवर-वधू परिचय मेळाव्याचे उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन, त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कार्यकर्ता गौरव पुरस्कार वितरण, हुंडा न घेणाऱ्या जोडप्यांचा सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि उपवर-वधू परिचय मेळावा आणि सामुहिक विवाह आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. यंदाच्या मेळाव्याचे हे ३० वे वर्ष असून या मेळाव्यात विवाह करु इच्छिणाऱ्या वर आणि वधू पक्षाकडून केवळ १ रुपया नाममात्र शुल्क घेऊन विवाह लावून दिला जातो.तसेच नवदाम्पत्यांना संसारोपयोगी भांडी सुद्धा मंडळाकडून भेट दिली जातात. आदिवासी माना जमातीमधील फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, उपवर-वधूंच्या पालकांनी आपल्या पाल्यांची सविस्तर माहिती, इच्छुक जमातबांधवांनी समाजप्रबोधनपर लेख, कविता आदी साहित्य संजय गायकवाड मो.क्र. ९९२१९८९८२५, बी.पी.हनवते मो.क्र. ९८५०३५८२७२ किंवा सुनील नन्नावरे मो.क्र. ७७९८३८७०४६ या मोबाईल क्रमांकावर पाठवावे तसेच मेळाव्याला मोठ्या संख्येत माना जमात बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आदिवासी माना जमातीचा उपवर-वधू परिचय मेळावा यंदा १ फेब्रुवारी रोजी*.                                                         
Previous Post Next Post