श्री साईबाबा प्रतिमेच्या भव्य शोभा यात्रने भद्रावती नगरी दुमदुमली .. ( महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.23:-भद्रावती स्थानिक बगडेवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात दि. १८ , १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी श्री साईबाबा स्थापना दिन उत्सव निमित्य काढण्यात आलेल्या श्री साई बाबा प्रतिमेच्या भव्य शोभा यात्रेने भद्रावती नगरी दुमदुमली स्थापना दिना निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेला होते. यानिमित्त भव्य शोभायात्रा, घटस्थापना, भजन, किर्तन रांगोळी स्पर्धा, भारूड, ह्दय रोग तपासणी शिबीर, स्वच्छता अभियान, ज्ञानेश्वरी हरिपाठ यांचा समावेश होता. सांय ५ वाजता बॅड पथक, भजन मंडळ, डिजे यांच्या सह काढण्यात आलेल्या श्री साईबाबा प्रतिमेची पालखी शोभायात्रेने भद्रावती नगरी दुमदुमली.या शोभा यात्रेत कलशधारी महिला भगिनी, भजन दिंडी, श्री साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध दृश्य ,संतोषी बँड पथक आणि दुर्गा वाहिनी आदि शोभा यात्रेचे विशेष आकर्षण होते. ही शोभायात्रा श्री साईबाबा मंदिर बगडेवाडी इथून जुने वडाचे झाड, विठ्ठल मंदिर, किल्ला वार्ड, वाल्मीक चौक, जंगल नाका, परत जुना बसस्टॉप महात्मा गांधी चौक मार्गाने परत प्रारंभ स्थळी आली. या वेळी चौका चौकात साई भक्तांनी साई बाबाच्या प्रतिमेचे पुजन केले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी सुध्दा करण्यात आली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.या वेळी हजारो भक्तांनी महाप्रसादा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साई बाबा उत्सव समिती चे अध्यक्ष रामभाऊ बिरे, सचिव अनिल बगडे, संयोजक गोपाल ठेंगणे , रामराव भोगेकर,शालीक दानव, वसंता लोणकर, शरद राजुरकर , राहुल बोरकर, जिवनदास येरमे दत्ताञय गोवारदिपे, शंकरराव पत्तीवार प्रकाश बगडे, बाळकृष्ण कुटेमाटे, मनिष वाकडे, अभय बगडे रविंद्र गोवारदिपे विलास सातपुते तथा कार्यकारिणी सदस्य तसेच साई भक्तांनी सहकार्य केले.

श्री साईबाबा प्रतिमेच्या भव्य  शोभा यात्रने भद्रावती नगरी दुमदुमली ..                                                                                  
Previous Post Next Post