*युवा ग्रामीण पत्रकार संघाकडून नवे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे स्वागत करण्यात आले*. (वर्धा प्रतिनिधी) वर्धा जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा आता अनुभवी आयपीएस अधिकारी सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अग्रवाल यांची वर्धा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सध्याचे पोलीस अधीक्षक अनराग जैन यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीनंतर वर्ध्याची जबाबदारी सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे देण्यात आली आहेअग्रवाल यांना जिल्हा पोलीस प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासोबतच जनसामान्यांशी संवाद वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला होता.संवेदनशील आणि महत्त्वाच्या वर्धा जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सौरभ कुमार अग्रवाल कोणती धोरणात्मक पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय पोलीस सेवेतील एक अनुभवी आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष तुषार रेड्डी वार, कोषाध्यक्ष अमित भोसले, संपर्कप्रमुख आशिष जाचक व इतर उपस्थित होते

युवा ग्रामीण पत्रकार संघाकडून नवे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे स्वागत करण्यात आले*.                 
Previous Post Next Post