महराष्ट्र शासन महसुल विभाग.उपविभागीय अधिकारी अकोट तथा निवडणुक निर्णय अधिकारी नगर परिषद सार्वत्रिक दुरध्वनी क्रमांक ०७२५८-२२२६७४E-Mail-akotmc@gmail.comक्रमांक नप/सानि/कावि २३५/२०२५निवडणुक महत्वाचे/अत्यंत तातडीचे(निवडणुक विभाग) निवडणुक २०२५ जि. अकोला यांचे कार्यालय पिनकोड - ४४४१०१दिनांक २०/१२/२०२२प्रेसनोटअकोट शहरातील नागरीकांना आवाहन करतो की, उदया दिनांक २१/१२/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजतापासुन ट्रायसेम सभागृह, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था परिसर, पोपटखेड रॉड, अकोट येथे नगर परीषद सार्वत्रिकनिवडणुक २०२५ ची मतमोजणी पार पडणार असुन त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी साहेब, अकोला यांचे आदेशाने उदयादि. २१/१२/२०२५ रोजीचे सकाळी ०६.०० वा. पासुन संध्याकाळी ०६.०० वा. पर्यंत अकोट ते पोपटखेड रोडवरील वाहतुकअकोट वरून ग्रामीण रुग्णालयाचे लगत जुना बोर्ड रोड ते मोहाळा मार्गे वळविण्यात आलेली आहे. तसेच पोपटखेड कडुनयेणारी वाहतुक मोहाळा ते अकोली जहाँगीर फाटा अंजनगाव रोड मार्गे वळविण्यात आलेली आहे.तसेच नगर परीषद निवडणुक निकालाचे पार्श्वभुमीवर मा. जिल्हाधिकारी साहेब, अकोला यांनी मतमोजणी केंद्राचेआजुबाजुचे २०० मीटर परीसरात अनधिकृत व्यक्तींना कलम १६३ भारतीय नागरीक सुरक्षा संहीता अन्वये प्रवेशास बंदीकेली असुन मतमोजणी केंद्रावर फक्त उमेदवार, उमेदवार प्रतिनीधी तसेच उमेदवारांनी अधिकृत प्रतिनिधी व पत्रकारयांनाच त्यांचे ओळखपत्र पाहुन प्रवेश देण्यात येणार आहे.मतमोजणी कक्षाचे २०० मिटर बाहेर ओळखपत्र वितरण कक्षात मतमोजणी केंद्रावर फक्त उमेदवार, उमेदवारप्रतिनीधी तसेच उमेदवारांनी अधिकृत प्रतिनिधी यांचे मोबाईल संकलीत करण्याची व्यवस्था यास्तरावरुन करण्यात आलेलीआहे सदर ठिकाणी आपल्या जबाबदारीवर मोबाईल ठेवावा सदर ठिकाणाहुन मोबाईल फोन हरवल्यास याची सर्वस्वीजबाबदारी स्वतः ची राहील याची नोंद घ्यावी.सदर ठिकाणी उपस्थित राहतांना उपस्थितांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन घेवुन जाण्यास मनाई असुनमतमोजणी प्रकीयेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास, फोटो काढण्यास मनाई केली आहे. सदरचे नगरपरीषद निवडणुकनिकालाचे अनुषंगाने अकोट शहरात सर्वत्र पोलीस विभागाचे फिक्स पॉईंट लावण्यात आले असुन पोलीस प्रशासनबंदोबस्तासाठी सज्ज आहे.करीता सर्व नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post Next Post