नारणाला उत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ -आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर**झरी बाजार-येथे आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर यांची सभा संपन्न* (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)सातपुडा पायथ्याशी वसलेल्या गावात हिंसक वन्य प्राण्यामुळे दहशत पसरलेली आहे. गावागावात हिंसक प्राणी वाघ,बिबट,अस्वल शिरकाव करीत आहेत. ग्रामीण नागरिकांवर हमले करत आहेत. शेतात जाण्याकरिता शेतकरी, शेतमजूर घाबरत आहेत.पिकाला पाणी देण्याकरिता एक मजूर जात असताना त्याला संरक्षण करिता चार माणसे लागत आहेत.याकडे दुर्लक्ष करून वण्याविभाग आणि प्रशासन नरनाळा महोत्सव या भागात उत्सव साजरा करीत आहे.हे चिंतेची बाब आहे. खरं तर त्यांनी आधी मानव प्रजाती व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाययोजना करायला हव्या होत्या परंतु मागील एक महिन्यापासून *मानव प्रजाती वाचवा* आंदोलन सुरू असून प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करून उत्सव साजरा करते हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे.दरवर्षी महाराष्ट्रात10हजार कोटी ते40हजार कोटी या वन्यप्राण्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती असून राष्ट्रीय संपत्ती चे नुकसान होत आहे.या कडे प्रशासन गंभीरतेने बघत नसल्याने ग्रामीण, आदिवासी,शेतकरी वर्गाची चेष्टा करून उत्सव साजरा करण्यात धन्यता मानत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात येऊन 47 वर्ष झाली.या वर्षात प्राण्यांची वाढ झपाट्याने झाली. यांचा प्रजनन चा दर लक्षात घेतला गेला नाही. त्यामुळे हिंसक प्राणी नागरी वस्तीत येऊन शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गोठ्यातून पळवून नेत आहेत.येणाऱ्या पिढी वर वन्य प्राणी एक संकट आहे.यावर तातडीने उपाययोजना प्रशासनाने कराव्यात कारण वन्यप्राणी हे वण्याविभागाची जबाबदारी आहे. त्यांनी आपली जबाबदारी करावें पार पाडावी. या पासून पर्यटनाला संधी उपलब्ध होते. यातून प्रशासन कडे पैसे गोळा होतात. जंगल सफरीत एका गाडीकडून 3800 रुपये घेण्यात येतात.शेकडो गाड्या रोज शहानुर येथे जंगल सफरीला जात असतात.आपण पैसे मिळवावे व त्रास आम्हाला द्यावा की बाब न्यायला धरून नाही. पर्यटन वाढलं पाहिजे यात दुमत नाही पण त्याचा स्थानिकांना फायदा मिळायला हवा होता पण तसं न घडता उलट वन्यप्राण्यामुळे नुकसान,दहशत,हमले हे शिकारी प्रवृत्तीचे प्राणी करीत आहेत. या मुळे ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झालेला आहे.येणाऱ्या 30 जानेवारी पर्यंत वण्याविभाग व प्रशासन यांनी आमच्या आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यास 30 जानेवारी ला आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा सर्व ग्रामिंणी एकमताने ठराव सभेत पास केला.जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार या आंदोलनात लोकांनी शामिल होण्याचे आवाहन आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर यांनी सभेत केले.अफजल भास्कर,मोहन खिरोडकार, दिनेश गिर्हे,रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व बहुसंख्य शेतकरी,शेतमजूर, ग्रामस्थ उपस्थित होते.*एकीकडे ग्रामीण शेतकरी व शेतमजूर याच्यावर हिंसक प्रवृत्तीचे प्राणी हमला करीत आहेत.वन्यप्राणी देशाची 10 हजार ते 40 हजार संपत्ती नष्ट करीत आहेत.तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.यांना मानव प्रजाती व देशाच्या संपत्ती ची काजळी नसल्याने डॉलर ची किंमत वाढून रुपयात घसरण आलेली आहे. शेतकरी व ग्रामिनांवर हमले होत असतांना,वण्याविभाग व प्रशासन या भागात उत्सव साजरा करीत आहे. हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.म्हणून आम्ही येणाऱ्या 30जानेवारी ला मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करणार आहोत.-आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर*
byमीडीया पोलीस टाईम
-
0