*मानवत तालुक्यातील 19 विद्यार्थ्यांचे टंग टाय शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न.*. (मानवत / प्रतिनिधी.) ———————————————— {{ पिएमश्री जि प मानवत शाळेचे माणिक घाटुल यांच्यातर्फे मुलांना आईस्क्रीम व पालकांना अल्पऊपहाराचे वाटप. }}दर वर्षाप्रमाणे या ही वर्षी देखील समावेशित शिक्षण विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणारे जिभेचे शस्त्रक्रिया (टंग टाय) ग्रामीण रुग्णालय मानवत येथे यशस्वीरित्या पार पडली. मानवत तालुक्यातील एकूण 30 विद्यार्थ्यापैकी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 19 विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आले. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाले असून मुलांना चार तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवून औषध गोळ्यां देऊन मुलांना घरी पाठविण्यात आले. या कामी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ तेजस तांबोळी व डॉ शेख आशिक हुसेन यांनी शस्त्रक्रिया पार पाडले. या शिबीरासाठी विद्यार्थी उपस्थित ठेवण्यासाठी समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षक *ज्ञानेश्वर जलशिंगे,* दत्ता शहाणे, संतोष पांचाळ व मल्लिकार्जुन देवरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून सर्व मुलांना शस्त्रक्रियेसाठी पालकांना समुपदेशन करून मुलांना उपस्थित ठेवले या वेळी शस्त्रक्रियेसाठी शाळा स्तरावर होणारे आरोग्य तपासणी दरम्यान आढळणारे वाचादोष विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ग्रामीण बाल स्वास्थ्य अभियान अंतर्गत कार्यरत *NRHM* डॉक्टरांच्या टीमने मुलांची तपासणी करून त्यांना ग्रामीण रुग्णालय मानवत येथे रेफर करण्यात येतात. शस्त्रक्रिया शिबिरा दरम्यान संपूर्ण ग्रामीण रुग्णालय मानवाच्या टीमसह NRHM, RBSK, समावेशित शिक्षण विभाग पूर्ण वेळ कार्यरत होते.शस्त्रक्रिया शिबिरासाठी मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मंगेशजी नरवाडे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नीलू पवार, केंद्रप्रमुख ओम मुळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्याची विचारपूस केली. तर या बरोबर केंद्रप्रमुख प्रकाशजी मोहकरे, उमाकांतजी हाडोळे, विनोदजी गायकवाड, साधन व्यक्ती राजकुमारजी गाडे, आत्मारामजी पाटील, दिगंबरजी गिरी, प्रतोदजी बोरीकर, सीमाताई सिसोदे, गजाननजी वांबुरकर यांनी परिश्रम घेऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांना या वेळी शुभेच्छा दिले.संपूर्ण शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी पार पडल्यानंतर पी.एम.सी. शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ यांच्या तर्फे सर्व पालकांना अल्पउपहार व मुलांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. सोबतच सीमाताई सिसोदे व सपनाताई राऊत यांच्यातर्फे मुलांना बिस्किट खाऊचे वाटप करण्यात आले. असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी मल्लिकार्जुन देवरे यांनी बोलतांना दिली.**
byमीडीया पोलीस टाईम
-
0