**संस्कृति, धर्म आणि गोमाता ही भारताची ओळख**@)> जगद् गूरू स्वामी रामदयालजी महाराज.*. (मानवत / प्रतिनिधी.)चांगले चारित्र्य, संस्कृती, धर्म, आणि गोमाता, ही आपल्या भारताची ओळख आहे. जगद्गुरु स्वामी राम दयालजी महाराज यांनी आपल्या अमृत तूल्यवाणी व्यक्त केले.चांगले चरित्र संस्कृती धर्म आणि गोमाता आपल्या भारत देशाची ओळख असून ती गौरवनीय आहे. असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदाय शहापुरा धाम जिल्हा भीलवाडा राजस्थानचे चौदावे पीठाधीश्वर जगद्गुरु 1008 स्वामी राम दयालजी महाराज यांनी येथील पावरलूम शेजारच्या पटांगणामध्ये भव्य गोशाळेचे भूमिपूजन तसेच सौ.स्व. प्रमिलाबाई श्रीकिसन सारडा गौशाळा प्रवेशद्वाराचे पूजन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. यावेळी पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश भैय्या विटेकर, मानवत नगर पालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. अंकुशरावजी लाड, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज भैय्या आंबेगावकर, हे उपस्थित होते. यावेळी आचार्य श्री रामदयालजी महाराज यांच्या हस्ते सौ.स्व. प्रमिलाबाई श्रीकिसन सारडा प्रवेशद्वाराचे उद्घाटन स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गोशाळेचे भूमिपूजन आचार्य श्री रामदयालजी महाराज. आमदार राजेश भैय्या विटेकर. डॉ.अंकुशरावजी लाड व सभापती पंकज भैय्या आंबेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. आचार्य श्रीरामदयालजी महाराज यांच्या हस्ते आ. राजेश विटेकर यांना चांदीची गायची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. राणीताई लाड व नवनिर्वाचित डॉ. अंकुशरावजी लाड यांनाही चांदीची गायची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सभापती पंकज आंबेगावकर यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. या शुभ प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना आचार्य जगद्गुरु स्वामी श्रीरामदयालजी महाराज यांनी पुढे सांगितले. आपल्या भारतीय संस्कृतीचे नवे वर्ष हे चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा आहे. या देशातील प्रत्येक संत हे संस्कृतीचे पुजारी आहेत. मानवत नगरीच्या भूमीने सनातन धर्माची मशाल सतत तेवत ठेवली आहे. येथील रामस्नही संप्रदायाच्या रामबाडा मध्ये दररोज रामनाम जप आणि संप्रदायाचे जन्मदाता आचार्य श्री रामचरणजी महाराज यांनी स्वतः लिहिलेली वाणी ग्रंथाचे पठण आणि भजन कीर्तन संपन्न होतात. यामुळे मानवत नगरीचे संबंध आंतरराष्ट्रीय संप्रदायाची जुळले आहे. गोशाळेचे प्रवेशद्वार हे शक्तिपीठ, संस्कारमय पीठ, असुन यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे. येथील श्री किसनजी सारडा परिवारांनी आस्था व प्रेम आणि गोसेवा मध्ये सदा पुढाकार घेऊन त्यांची सेवा अविरत करत आहे. यासाठी संत महात्मे सद्गुरूची कृपा व आपल्या आई-वडिलांचे अर्शिवाद असणे आवश्यक आहे. माझे धर्मगुरू संत श्री भगत रामजी महाराज यांची कृपा आशीर्वाद सारडा कुटुंबावर अविरत आहे. गुलाबाच्या फुलाला आपली प्रशंक्षा स्तुती करणे, आकांशा साठी मोहताज नाही. गुलाबाचे फुल गुलाबाच राहणार. परमात्मा विना गुलाब नाही. कठीण प्रयत्न कष्ट केल्याशिवाय लक्ष्मीची प्राप्ती होत नाही. लक्ष्मी आपल्याला चार प्रकारातून प्राप्त होते आई, बहीण, पत्नी, आणि मुलगी. आई रुपी लक्ष्मीने घरात अन्नदान, गोसेवा धार्मिक कार्य घडतात, या पैशातून गोशाळेचे कार्य पण यशस्वीपणे चालते. पत्नी रुपी लक्ष्मीने शक्तीहीन, क्लेशदायक. दुसऱ्याने केलेल्या कार्याचे श्रेय स्वतः घेणे. गोशाळातून मिळणारे दूध हे अमृतमही आहे. लाभदायक आहे. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला आपल्या देशातील भ्रष्टाचार कधी मिटणार. त्यावर मी त्याला उत्तर दिले ज्या दिवशी आपल्या पोटाची भूक भागणार त्या दिवशी देशातील भ्रष्टाचार नष्ट होणार. आपला भारत देश त्याच दिवशी भ्रष्टाचार मुक्त होणार. गोर गरिबांना अन्नपुरवठा करून त्यांची भूक भागवणारे व शाकाहारी असणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय. नरेंद्र मोदी यांनी पूर्ण भारताचे नाव गौरवपूर्ण जगाच्या पाठीवर कोरलेले आहे. सध्या विश्वाचा गुरु हा भारत देश आहे. आपल्या पवित्र भूमीवर शत्रूची वाईट नजर पडू नये म्हणून नरेंद्र मोदी हे सदैव दक्ष आहेत. ते एक कठोर तपस्वी आणि गोसेवक आहे. तपस्या शिवाय देश पुढे जात नाही. यांच्यावर आई-वडिलांचे आशीर्वाद गोसेवा सेवेचे आशीर्वाद आहेत त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. आम्ही संत जन कुणाचेही गुलाम नाहीत. संविधान मोठे की वेद मोठे. कायदा बदलणे हे सोपे आहे. आज संविधानाच्या नावावर बोट उचलून आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी संविधानाला अपवित्र करत आहे. यांच्यासाठी संविधान काय आहे यांचे त्यांना महत्त्व नाही. आपला भारत देश हा गोसेवा प्रधान देश आहे. जगातील रशिया, अमेरिका, चीन, यांना संस्कृतीचे महत्त्व नाही. परंतु आपल्या भारताला गोसेवेची संस्कृती आहे. आपली हिंदू धर्माची संस्कृती हे सर्वश्रेष्ठ आहे. आपला भारत देश हा विश्वाचा गुरु असून वेदांचा देश आहे. आपल्या भारताची ओळख म्हणजे चांगले पवित्र चारित्र्य, धर्म,संस्कृती, आणि गोसेवा. ही आपल्या भारताची ओळख असून ती गौरवनीय आहे. गोदानाचे संकल्प धारण करा. आपल्या लग्नाचे वाढदिवस साजरे करताना गोशाळा मध्ये जाऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करा. यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होणार नाही. आपल्या मुलांचे नामकरण व वाढदिवस हे गौशाळामध्ये जाऊन साजरे करा. गायीच्या मूल्या इतकी मूल्य कुठलेही नाही. माझ्या देशाची गौरव ही गोमाता आहे. ती पशु नसून गो राष्ट्रमाता आहे. गौशाळा मध्ये अमृत मिळते. गाईचे दूध हे अमृता समान आहे. गाईचे दूध पिणारा हा कधीही राष्ट्रद्रोही,समाजद्रोही, व मातपिता द्रोही असू शकत नाही. गोमातेच्या स्तनात दूध नसून हे अमृत आहे. संत सद्गुरु हे नेहमी जीवनाचे कल्याण करणारे असून ते निस्वार्थपणे समाजाची सेवा करतात. यांच्या आशीर्वाद व कृपेने आपले जीवनाचे कल्याण होत नाही. संत महात्मे नेहमी देशाच्या रक्षणासाठी व धर्माच्या रक्षणासाठी सदैव हे पुढाकार घेतात. असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदायाचे 14 वे विटाधीश्वर जगतगुरु स्वामी 1008 श्री रामदयालजी महाराज यांनी येथील नवीन गोशाळेचे भूमिपूजन व सौ.स्व. प्रमिलाबाई श्रीकिसन सारडा गौशाळेचे प्रवेशद्वाराचे पुजनाच्या आयोजन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0