यावल पोलिसात 11 जनाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.... (मुख्य जिल्हा प्रतिनिधी प्रवीण मेघे )मृतांना जिवंत दाखवून आणि बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल 11 कोटी 15 लाख रुपये किमतीची तीन हेक्टर 19 आर सुमारे सव्वा सात एकर शेत जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यात उघडकीस आला आहे याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मुख्य सूत्रधारासह 11 जनाविरुद्ध भारतीय न्याय साहि तेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार कांचन संजय खत्री वय 52 रा जालना यांचे काका गेला राम भुरा मल रा जालना यांच्या मालकीची मोजे बोरवल खुर्द ता यावल येथे गट क्रमांक 193 मध्ये तीन हेक्टर 19 आर जमीन होती गेलाराम बुरामल यांचा मृत्यू एक जानेवारी 1995 रोजी झाला होता मात्र आरोपींनी संगणमत करून ही जमीन बडकावण्याचा कट रचला मुख्य आरोपी अजित तुळशीराम भंडारी रा अंबरनाथ याने संशयित आरोपी क्र दोन 2 शlम मनोहर मृदंड याला मृत गेलाराम भुरामल म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले आरोपींनी गेला राम भुरामल, यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केले आणि ते खरे असल्याचे बसवले 16 जानेवारी 20 23 रोजी या बनावट व्यक्तीच्या माध्यमातून 11 कोटी 15 लाख रुपयाचा बनावट खरेदी खत दस्त नोंदवण्यात आला यानंतर आरोपींनी संगणमत करून या जमिनीचे दोन भाग केले 5 डिसेंबर 20 २४ रोजी एक हेक्टर 45 आर जमीन सकु, बाई धनगर हिच्या नावावर तर 2 एप्रिल2025, रोजी उर्वरित1 हेक्टर 74 आर जमीन प्रशांत वसंतराव पाटील यांच्या नावावर करून देण्यात आली या प्रकरणात अजित तुळशीराम भंडारी अंबरनाथ श्याम मनोहर मुदंडा वसई सचिन हेमचंद्र राऊत नवी मुंबई उमेश चंद्रकांत कदम विरार सकुबाई, धनगर शांताराम धनगर रवींद्र धनगर ईश्वर यशवंत पाटील दिलीप लक्ष्मण धनगर सर्व रा बोरवल खुर्द प्रशांत वसंतराव पाटील आणि किशोर सुरेश माळी रा यावल व इतर अशा एकूण 11 जनावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिर्यादी कांचन खत्री यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

यावल पोलिसात 11 जनाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल....                                                                                           
Previous Post Next Post