जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा. *@)> सुभाष ढगे**————————(**मानवत/ अनिल चव्हाण.*)——————————— कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालया मध्ये आज दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता, राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करून सावित्री जिजाऊ सप्ताहाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या राजमाता जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्राकडून सुभाष ढगे यांचे *आम्ही जिजाऊच्या लेकी* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. जिजाऊनी राष्ट्र निर्मितीचे धडे शिवबा ला दिले. आज प्रत्येक मुलीने जिजाऊचा आदर्श घ्यावा. याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या संचालक मा.सौ. दिपलक्ष्मी ताई जामकर यांची उपस्थिती होती. तर याप्रसंगी प्राचार्य डॉ. रामचंद्रजी भिसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आजच्या आधूनिक काळात संयुक्त कुटूंब पध्दतीचे जामकर परिवाराचा हे एक आदर्श उदाहरण आहे. असे मत आपल्या अध्यक्ष समारोपात व्यक्त केले. बी. ए. प्रथम वर्षाच्या रुपाली जाधव व शुभांगी सरकटे व मनीषा राउत यांनी विश्व हिंदी दिनानिमित्त तयार केलेला हस्तलिखत अंकाचे विमोचन या प्रसंगी मान्यवरंच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहामध्ये सावित्रीबाई फुले एकांकीका, निबंध लेखन स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा इ चे यशस्वी आयोजन संपन्न होण्याकरिता राजमाता जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. संगीता लोमटे सदस्य डॉ.नसिम बेगम व समाजशास्त्र विभागाचे प्रा. परमेश्वर यादव यांनी योगदान दिले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थीनी व सर्व विभागातील प्राधापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0