विवेकानंद विद्यालयाला सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती : दिनांक ६ जानेवारी रोजी भांदक प्रेस क्लब, भद्रावतीच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या नृत्य स्पर्धेत स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धकांनी शालेय गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोरा संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे आणि इतर पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक दयाकर मग्गीडवार यांनी विजेत्या स्पर्धकांचे भरभरून अभिनंदन केले. विजेत्या स्पर्धकांना विद्यालयातील शिक्षक वृंद आशा गावंडे, तुकाराम पोफळे, संजय आगलावे, श्रीमती मेघा ताजने यांचे मार्गदर्शन लाभले.दिनांक १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात विजेत्या चमुला प्राप्त झालेले पारितोषिक ₹ ५५५५/- व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक दयाकर मग्गीडवार आणि स्पर्धक चमुची कर्णधार मीरा अरुण गुप्ता यांनी हे पारितोषिक स्वीकारले.याप्रसंगी मंचावर पुरुषोत्तम स्वान, अमन टेमुर्डे, प्राध्यापक डॉ बरडे, पत्रकार सुधीर पारधी, नगरसेवक फैय्याज शेख, नगरसेविका वृषाली पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

विवेकानंद विद्यालयाला सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक*.                                                                          
Previous Post Next Post