कार्यकारी अभियंता, सार्वजनीक बांधकाम उपविभाग सेलू यांच्या कृपाअर्शिवादाने बोगस कामाचा सपाटा*. (मानवत / प्रतिनिधी.)आंबेगाव दिगर गावापासून ते आंबेगाव पाटी पर्यंत चालू असलेलले रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असत्यामुळे त्याची उच्चस्तरीय समितीच्या वतीने चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली.सविस्तर वृत्त असे की,आंबेगाव दिगर ते आंबेगांव पाटी पर्यंत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत असलेल्या रस्ता हा अतिश बोगस तयार होत असल्याने या बोगस रस्त्याची उच्चस्तरिय समितीच्या माध्यमातून चौकशी करून दोषीवर दंडात्म कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्या संबंधीचे एक निवेदन सहया करणारे अर्जदार मौजे आंबेगाव दिगर येथील रहिवाशी असून गावापासून ते आंबेगाव पाटी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे व मजबुती करणाचे काम चालू आहे. परंतू सदरील सर्व काम हे इस्टीगेंट प्रमाणे न करता अत्यंत थातुर, मातुर पध्दतीने केल्या जात आहे. तसेच रस्त्यामध्ये असलेले पुल देखील केल्या जात नाहीत. पुल करीत नसत्यामुळे पावसाळ्यात रस्त्याचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच डांबरीकरणाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. संबंधीत गुत्तेदारास चांगल्या प्रकारे काम करणे बाबत व पुर्वीप्रमाणे असलेत्या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्या बाबत विनंती केली परंतू ते आमचे काही एक ऐकण्याच्या तयरीत नाहीत.राज्य शासनाच्या लाखो रूपयांच्या निधीचा खर्च होत असतांना देखील रस्त्याचे काम हे चांगल्या दर्जाचे व इस्टीमेंट प्रमाणे केल्या जात नाहीत. त्यामुळे आपण सदर रस्त्याची प्रत्यक्ष उच्चस्तरिय समितीच्या वतीने जाय मोक्यावर जावून स्थळ पाहणी करून होत असलेले बोगस व नियमबाह्य काम थांबवून चौकशी करावी व दर्जेदार काम करण्या बाबत व पुलांचे काम करण्या बाबत आदेशीत करावे व काम पुर्ण होईपर्यंत बिले ताढण्यात येवू नयेत अशी मागणी निवेदनात केली आहे. नसता आम्हा गावकऱ्यांना अंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल कृपया याची नोंद घ्यावी असा ईशारा निवेदनाद्बारे . अमोल विठ्ठलराव साखरे, मुरली मधुकर साखरे, गोविंद रामकिशन साखरे आंबेगाव दिगर येथील नागरिकांनी प्रशासनाला दिला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0