श्री कोरठण खंडोबा येथे 15 जानेवारीला, श्री गगनगिरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा!* ‌ श्री क्षेत्र कोरठण:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत, श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबागड पिंपळगाव रोठा,ता.पारनेर जिल्हा. अहिल्यानगर या राज्यस्तरीय 'ब'वर्ग तीर्थक्षेत्रावर गुरुवार दिनांक 15 जानेवारी पौष कृ. द्वादशी रोजी भक्तीमय वातावरणात ब्रह्मलीन परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा निमित्ताने सालाबाद प्रमाणे धार्मिक सत्संग, प्रवचन,दिंडी,मिरवणूक,प्रदक्षिणा, महाप्रसाद,दर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन श्री खंडोबा देवस्थान,जय गगनगिरी सेवाभावी मंडळ पिंपळगाव रोठा यांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी अभिषेक,पूजा होमहवन, यज्ञ सकाळी 9.30वाजता श्री महाराजांच्या प्रतिमेची रथातून मिरवणुकीने कोरठणगडाला प्रदक्षिणा सहभाग खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी,जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक,ग्रामस्थ भाविकभक्त यांच्या सहभाग राहील. सकाळी 11 वाजता ह भ प आकाश महाराज घोलप यांचे संगीतमय प्रवचन दुपारी 12.00 वाजता महाप्रसाद अन्नदान जय गगनगिरी सेवाभावी मंडळ पिंपळगाव रोठा आणि शिवभक्त श्री संकल्प संजय विश्वासराव रा. बेल्हे, ता.जुन्नर (श्री क्षेत्र कोरठण गडाचे मूळ मंदिर बांधकाम वंशज) यांचे वतीने सालाबाद प्रमाणे महाप्रसाद नियोजन आहे. चंपाषष्ठी सन 5 डिसेंबर 1997 ला तपस्वी परमपूज्य गगनगिरी महाराजांचे शुभ हस्ते लाखो भक्तांच्या मांदियाळीत श्री कोरठण खंडोबा मंदिर नवीन कळस शिखरावर सुवर्ण कलशावरोहण होऊन मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता.त्यानंतर देवस्थानचे वैभव वाढत राहिले तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले.चंपाषष्ठी सन 2016 मध्ये परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ध्यान मंदिरात करण्यात आली होती. सन 2017 पासून देवस्थान मध्ये पौष कृ. द्वादशीला दरवर्षी श्री महाराजांचा पुण्यतिथी सोहळा (समाधी दिवस)धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आला आहे. तरी भाविक भक्त जनतेने दिनांक 15 जानेवारी रोजी आयोजित या धार्मिक पर्वणीचा,दर्शनाचा,प्रवचन, महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे निवेदन देवस्थान तर्फे तसेच जय गगनगिरी सेवाभावी मंडळ, ग्रामस्थ,भक्तजन यांचे तर्फे करण्यात आले आहे.

श्री कोरठण खंडोबा येथे 15 जानेवारीला, श्री गगनगिरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा!*                                                   ‌
Previous Post Next Post