भक्ती आणि परंपरेचा संगम: दिघी (बोपापूर) येथे 'शेषणाग नागोबा' यात्रा उत्साहात संपन्न!.. (प्रतिनिधी.. विपुल पाटील मीडीया पोलीस टाईम वर्धा/) देवळी:देवळी शहराजवळ असलेल्या दिघी (बोपापूर) येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेवटच्या पौष रविवारनिमित्त शेषणाग नागोबाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडली. जुन्या परंपरेचा वारसा जपत भरणाऱ्या या यात्रेला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावत नागोबाचे दर्शन घेतले.घरोघरी 'पानग्यांचा' बेत आणि पाहुणचारदिघी (बो) येथील यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातील प्रत्येक घरात असलेला पानग्यांच्या जेवणाचा बेत. या दिवशी गावातील प्रत्येक घराघरात नातेवाईक आणि पाहुणे मंडळींची मांदियाळी असते. दुरून आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात गावकरी दंग असतात. विशेष म्हणजे, मंदिराच्या परिसरातही अनेक गावकरी एकत्र येऊन स्वयंपाक करतात, ज्यामुळे यात्रेला एका मोठ्या कौटुंबिक सोहळ्याचे स्वरूप प्राप्त होते.भक्तीचा जल्लोष आणि धार्मिक कार्यक्रमनागोबाच्या मंदिरात सकाळपासूनच पूजनाला सुरुवात झाली. आरती आणि भक्तीगीतांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भिल्टेकच्या यात्रेप्रमाणेच या 'शेषणाग पठाड' यात्रेलाही लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.सहकार्यातून यात्रेची रंगतयात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी टाकळी, चिखली, दिघी आणि बोपापूर येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. गेल्या दोन दिवसांपासून कोळना चोरे येथील अमोल कोलसुंगे यांनी यात्रेच्या व्यवस्थापनात मोठे सहकार्य केले, ज्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन घेता आले.बाजारपेठ आणि मनोरंजनाची रेलचेलयात्रेनिमित्त परिसरात मोठी बाजारपेठ सजली होती. यामध्ये: खेळणी व झुले: लहान मुलांसाठी मनोरंजनाची खास साधने. कटलरी व बेन्टेक्स: महिलांची गर्दी खेचणारी विविध दुकाने. पूजा साहित्य: हार, फुलं, नारळ आणि स्टेशनरीची असंख्य दुकाने.पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी भरणाऱ्या या यात्रेने परंपरेचा वारसा जपत सर्व गावकरी आणि भाविकांना आनंदाची पर्वणी दिली.

भक्ती आणि परंपरेचा संगम: दिघी (बोपापूर) येथे 'शेषणाग नागोबा' यात्रा उत्साहात संपन्न!..                               
Previous Post Next Post