मुलगी पळविण्याच्या संशयाने पातुरात खळबळ!दाम्पत्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई: अफवा न पसरविण्याचे आवाहन.. (अकोला जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राजेश दामोदर )पातूर : सात वर्षीय मुलीला पळवून नेतअसल्याचा संशय निर्माण झाल्यानेशनिवारी पातूर शहरात एकच खळबळउडाली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखीपसरताच शहरात लहान मुले पळविणारीटोळी सक्रिय झाल्याच्या चर्चेला उधाणआले.शहरातील एक सात वर्षाची मुलगीशनिवारी सकाळी ११.३०च्या सुमारासशाळेतून एकटी घरी जात होती. तीछत्रपती संभाजी महाराज चौकपरिसरातून जात असताना टीकेव्हीचौकाच्या दिशेने येणाऱ्या एका इसमानेतिच्याकडे रागाने पाहिले. त्यामुळे मुलगीघाबरली. त्यावेळी एका महिलेने 'मी तुलाघरी सोडते', असे सांगत तिचा हात धरूनछत्रपती संभाजी महाराज चौकाकडेचालण्यास सुरुवात केली. दरम्यान,त्याठिकाणी उपस्थित ओळखीच्या काहीमुलांनी मुलीला हाक मारली. ते ऐकताचतिने त्या महिलेचा हात झटकून घराकडेधाव घेतली. घरी पोहोचल्यानंतर तीघाबरून झोपून राहिली. पालकांनीविचारणा केल्यानंतर तिने घडलेलाप्रकार सांगितला.यानंतर मुलांनी त्या दाम्पत्याचाशोध घेतला असता, ते गावंडगावकडेजाणाऱ्या ऑटोमध्ये बसत असल्याचेदिसून आले. ईदगाह परिसरात ऑटोथांबवून पोलिसांना माहिती देण्यातआली. यावेळी काही नागरिकांनी त्याइसमास मारहाण केली. घटनास्थळीदाखल झालेल्या पोलिसांनी दाम्पत्यालाताब्यात घेतले. पुढील तपास करूनत्यांच्यावर कारवाई करण्यात येणारआहे.मुले पळविणारी टोळीसक्रिय असल्याच्या अफवाया घटनेनंतर शहरात "लहान मुलेपळविणारी टोळी सक्रिय" असल्याच्याअफवा पसरल्या. पोलिसांनी कोणतीहीघटना सत्यता तपासल्याशिवाय सोशलमीडियावर अफवा पसरवू नयेत, अन्यथासंबंधितांवर कारवाई करण्यात येईल,असा इशारा दिला आहे.पोलिसांकडून तपास सुरूसहायक पोलिस उपनिरीक्षकहिम्मत डिगोळे यांच्या तक्रारीवरूनसंबंधित दाम्पत्याविरुद्ध भारतीयन्याय संहितेच्या कलम १२८ अंतर्गतप्रतिबंधात्मक कारवाई करण्यातआली आहे. या प्रकरणात प्रत्यक्षातअपहरणाचा प्रयत्न झाला होता कीमुलगी घाबरल्याने हा प्रकार घडला,याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0