**साईभक्तासाठी* पुणे ते हुजूर साहेब नांदेड पर्यंत धावणारी एक्सप्रेस खडकी किंवा पनवेल पासून सुरू करा. (मानवत / अनिल चव्हाण.) ९५२७३०३५५९-———————————नांदेड - पुणे व पुणे - नांदेड या एक्सप्रेस रेल्वेचा मानवतरोड रेल्वे स्टेशनला थांबा देण्यासाठी निवेदन.हुजूर साहेब नांदेड ते पुणे व पुणे ते हुजूर साहेब नांदेड गाडी संख्या 17629 व 17630 या दोन्ही एक्सप्रेस आता नांदेड ते हडपसर व हडपसर ते नांदेड अशी धावणार आहे. याबाबतचे आदेश दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दोन्ही एक्सप्रेस रेल्वे चा थांबा मानवतरोड रेल्वे स्टेशनला देण्यात यावा तसेच या दोन्ही एक्सप्रेस हडपसर ऐवजी खडकी रेल्वे स्टेशन किंवा पनवेल रेल्वे स्टेशन पासून सोडण्यात याव्या याबाबतचे निवेदन भाजप रेल्वे प्रवासी प्रकोस्ट परभणी जिल्हा कार्यकारणी व पाथरी साई स्मारक समितीच्या वतीने मुख्य व्यवस्थापक दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, व विभागीय व्यवस्थापक नांदेड यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. सविस्तर असे की पुणे येथील रेल्वे स्थानकामध्ये दुरुस्तीचे कार्य चालू असल्याने दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने हुजूर साहेब नांदेड ते पुणे धावणारी एक्सप्रेस आता हडपसर पर्यंत धावणार असल्याचे आदेश काढण्यात आले आहे. व हडपसर येथुन नांदेड कडे रवाना होणार आहे.ही रेल्वे हडपसर पर्यंत धावणार असल्याने मराठवाडा विभागातून हजारो प्रवासी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना यापुढे पुणे शहरात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. हडपसर येथे सकाळी रेल्वे पोहोचल्याने पुणे कडे जाण्यासाठी वाहने उपलब्ध नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. सदरची एक्सप्रेस ही हडपसर ऐवजी खडकी रेल्वे स्टेशन किंवा पनवेल रेल्वे स्टेशन पासून सोडण्यात यावी तसेच हुजूर साहेब नांदेड ते खडकी रेल्वे स्टेशन किंवा पनवेल रेल्वे स्टेशन पर्यंत सोडण्यात यावी याबाबतचे निवेदन. भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोस्ट परभणी जिल्हा कार्यकारणी, व पाथरी येथील साई जन्मभूमी साई स्मारक समितीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. देण्यात येणाऱ्या निवेदनामध्ये पाथरी येथील साईबाबा जन्मभूमीच्या दर्शनाचा लाभ साई भक्तांना व्हावा यासाठी मानवतरोड रेल्वे स्टेशनला नांदेड- पुणे व पुणे -नांदेड या एक्सप्रेस रेल्वे चा थांबा घ्यावा.अशा मागणीचे निवेदन पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ.राजेश विटेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली असून या दोन्ही मंत्री महोदयांनी मानवतरोड रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्यांचे थांबे मंजूर करावे या मागणीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.भा.ज.प.रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ जिल्हा कार्यकारिणीच्या देण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हा संयोजक विजय मंत्री, महीला संयोजिका डॉ.किर्ती मुंदडा,सहसंयोजक के.डी.वर्मा व महिला सहसंयोजिका सौ.भारती पोरवाल व पाथरी साई स्मारक समितीच्या वतीने कार्यकारी सचिव व विश्वस्त एडवोकेट अतुल चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.***

*साईभक्तासाठी* पुणे ते हुजूर साहेब नांदेड पर्यंत धावणारी एक्सप्रेस खडकी किंवा पनवेल पासून सुरू करा.                                                                                 
Previous Post Next Post