दिनांक :रविवार 18/01/2026तो दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय क्षण होता — माझा साक्षगंध सोहळा.साक्षगंध हा प्रत्येक घरात होणारा साधा कार्यक्रम असतो, पण त्या दिवशी घडलेला एक प्रसंग मात्र आयुष्यभर मनात कोरला गेला.माझ्या साक्षगंधाला माझ्या सासरे — श्री. ज्ञानेश्वर मनवर — यांची आई, तब्बल १०५ वर्षांची आजी, उपस्थित होती. वयाने थकलेलं शरीर, थरथरते हात… पण डोळ्यांत अपार माया आणि आशीर्वाद. इतक्या वृद्ध वयातसुद्धा तिने आपल्या नातीच्या साक्षगंधाला येऊन आम्हा दोघांना आशीर्वाद दिला.त्या क्षणी संपूर्ण मंडपाचं लक्ष केवळ त्या आजीकडे वेधलं गेलं होतं.सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता — आजच्या काळात इतक्या वृद्ध आई-वडिलांची अशी मनापासून सेवा कोणी करतो का?कारण याच समाजात, आपल्या बार्शीटाकाळी अकोला रोडवरील वैरुद्ध अनाथ आश्रमात, काही श्रीमंत मुलांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सोडून दिल्याची उदाहरणं आपण पाहतो.आणि इथे मात्र, त्याच समाजात, एका वृद्ध आईला घरात सन्मानाने, प्रेमाने आणि मायेने जपणारी कुटुंबव्यवस्था उभी होती.आणि मग तो क्षण आला…आजीने हळूच आपल्या कमरेला बांधलेल्या जुन्या पिशवीकडे हात नेला.त्या पिशवीतून तिने फक्त तीस रुपये काढले.रक्कम छोटी होती, पण त्यामागचं प्रेम अमर्याद होतं.तिने ते पैसे आमच्या दोघांच्या डोक्यावरून फिरवले,आणि थरथरत्या हातांनी आमच्या हातात ठेवले.तो क्षण शब्दांच्या पलीकडचा होता.मग आजीने डोळे भरून आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाली —“प्रतीक्षा, तू टेन्शन घेऊ नकोस. माझा नातू आहे ना…तो तुझी सेवा करेल.तू जा, लग्न करून सुखी राहा.”हे शब्द बोलताना आजीच्या डोळ्यांत अश्रू आले.ते अश्रू दुःखाचे नव्हते,तर विश्वासाचे, समाधानाचे आणि मायेचे होते.त्या तीस रुपयांतआशीर्वाद होते,संस्कार होते,आणि संपूर्ण आयुष्याचा आधार होता.या एका प्रसंगातून मला आयुष्याची फार मोठी शिकवण मिळाली —परिस्थिती कितीही कठीण असो,आई-वडिलांची सेवा कधीही सोडू नका.कारण सेवा केली तर पुण्य मिळतं,पण प्रेमानं सेवा केली तरईश्वर स्वतः डोळ्यांसमोर उभा राहतो.— वैयक्तिक मतअमोल जामनिक

Previous Post Next Post