**मानवत येथील डॉ. राशी लड्डा हिचा नवा विश्वविक्रम*(डिकन्स्ट्रक्टच्या“डर्माथॉन”मध्ये डॉ. राशी लड्डा (सोनी) यांचा ऐतिहासिक सहभाग. (मानवत / अनिल चव्हाण. ————————————डिकन्स्ट्रक्ट(Deconstruc) या आघाडीच्या स्किनकेअर ब्रँड तर्फे १० आणि ११ ऑक्टोबर रोजी झूम प्लॅट फॉर्मवर आयोजित करण्यात आलेल्या २४ तास ४५ मिनिटांच्या सलग लाईव्ह “डर्माथॉन” कार्यक्रमाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. या ऐतिहासिक विश्वविक्रम उपक्रमात भारत भरातील अनेक नामवंत त्वचारोग तज्ञांनी सहभाग घेतला.या डर्माथॉन मध्ये डॉ. राशी लड्डा (सोनी), प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ व स्किन हेल्थ एज्युकेटर, यांनी विशेष ठसा उमटवला. त्या या संपूर्ण उपक्रमात सलग पाच तास सत्र चालवणाऱ्या एकमेव त्वचारोग तज्ञ ठरल्या या कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरले.डॉ. राशी लड्डा यांनी त्यांच्या सत्रांमध्ये मुरुम (ॲक्ने), केस गळणे, हार्मोनल त्वचा समस्या, दैनंदिन स्किनकेअर बाबतचे गैरसमज अशा अनेक सामान्य पण महत्त्वाच्या विषयांवर सखोल आणि वैज्ञानिक माहिती दिली. झूमवर थेट उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे प्रश्न त्यांनी अत्यंत सोप्या, समजण्यासारख्या आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून उत्तर देत सोडवले.त्यांच्या सत्रांना मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद लाभला. रुग्ण-केंद्रित संवादशैली, सातत्यपूर्ण उपस्थिती आणि विश्वासार्ह वैद्यकीय मार्गदर्शन यामुळे डॉ. राशी लड्डा यांचा सहभाग हा डर्माथॉनचा एक प्रमुख आकर्षण ठरला.डिकन्स्ट्रक्टद्वारे आयोजित करण्यात आलेला हा डर्माथॉन केवळ एक विक्रमी कार्यक्रम नसून, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्वचा व केसांच्या आरोग्या विषयी योग्य माहिती जनते पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रभावी प्रयत्न ठरला आहे. या करिता त्यांची गिनीज़ विश्वविक्रमात नोंद घेतली असून त्यांना यासाठी पुरस्कृत केले गेले आहे.या उपक्रमात डॉ. राशी लड्डा (सोनी) यांचा उल्लेखनीय सहभाग भविष्यातील अशा जनजागृती उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल.या मधिल विशेष गोष्ट अशी की ही मानवत शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व नामवंत सुप्रसिद्ध डॉ. राजकुमार लड्डा व सौ. सुनिता लड्डा यांच्या त्या सुनबाई असुन शहरातील हृदय रोग तज्ञ डॉ मधुसूदन लड्डा यांच्या त्या पत्नी आहे.सर्व स्तरातून त्यांच्या या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल कौतूक व अभिनंदन केले जात आहे.***

मानवत येथील डॉ. राशी लड्डा  हिचा नवा विश्वविक्रम*(डिकन्स्ट्रक्टच्या“डर्माथॉन”मध्ये डॉ. राशी लड्डा (सोनी) यांचा ऐतिहासिक सहभाग.                                           
Previous Post Next Post