परमहंस श्री पुंडलिक महाराज विद्यालय देऊळगाव येथे क्रीडा सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धा उत्साहात संपन्न.... (अकोला जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) परमहंस श्री पुंडलिक महाराज विद्यालय देऊळगाव तालुका पातुर येथे दिनांक 19 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात लिंबू चमचा शर्यत संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा धावण्याची धावण्याची स्पर्धा तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या सर्व स्पर्धा विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडल्या क्रीडा सप्ताह बरोबरच आनंद मेळाव्याची सुद्धा आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल खेळ उपक्रमांमधून सहभाग घेत आनंद मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला दरम्यान दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री रविंद्रजी सोनवणे सर यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत विद्यालयातील इयत्ता पाचवीचा 94 टक्के 53 पॉईंट उत्कृष्ट निकाल लागल्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे अभिवादन करण्यासाठी त्यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या समवेत पातुर पंचायत समिती शिक्षण विभागातील श्री उके .सर हेही होते उपस्थितीत होते विद्यालयाच्या वतीने मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आनंद मेळाव्याचे उद्घाटन श्री रवींद्रजी सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचवण्यासाठी प्रेरणा देत काही उपयुक्त सूचना दिल्या श्री सोनवणे सर यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर तपासला व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस टाईम मीडियाचे.श्री संतोष भाऊ उपर्वट यांची भेट घेऊन शाळेचा प्रगती बाबत व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली ही शाळेसाठी निश्चितच अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस टाईम मीडियाचे जिल्हा प्रतिनिधी संतोष भाऊ उपर्वट विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरवसे सर तसेच आढाव सर खराब सर मसने सर सांगळे सर इंगळे मॅडम गणेश राऊत श्री रेवाळे भाऊ आधी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा सप्ताह व आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यालयाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

परमहंस श्री पुंडलिक महाराज विद्यालय देऊळगाव येथे क्रीडा सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धा उत्साहात संपन्न....                   
Previous Post Next Post