देशप्रेमाच्या वज्रमुठीसाठी आजही वंदे मातरम् गरजेचे..श्रीकांत नेवे ... (चोपडा( संजीव शिरसाठ) - स्वातंत्र्यपुर्व काळात 'वंदे मातरम्' या मंत्राने संपुर्ण जाती धर्म विरहित भारतीय समाजाची एकजूट केली.त्यामुळे निर्माण झालेल्या वज्रमुठीमुळे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मोठी भुमिका पार पाडली.देश स्वतंत्र झाला.परंतू आज भारतात समाज वेगवेगळ्या कारणांनी दुंभगला गेल्याचे चित्र आहे.भारताला वेगाने प्रगती साधण्यासाठी विषमता संपविण्यात आजही वंदे मातरम् मंत्र उपयुक्त ठरू शकतो.त्यामुळे शासन वंदे मातरमची १५० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.त्याच्या प्रेरणा प्रत्येकाने घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार श्रीकांत नेवे यांनी केले.निमगव्हाण ता.चोपडा येथील दादाजी दरबारच्या सभागृहात भगिनी मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या रा.से.योजना विभागाच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांत ' वंदे मातरम्@१५०' या विषयावर नेवे बोलत होते.अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल बाविस्कर होते.प्रारंभी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी 'सोशल मिडीया व पत्रकारिता' या विषयावर आपले मनोगत व्यक्त करतांना सोशल मिडीया पेक्षा वृत्तपत्रातील लिखाणाला विश्वासार्हता अधिक असते.सोशल मिडीया मुळे जग खूपच जवळ आले आहे.त्यामुळे घडीत घटना वेगाने सर्वत्र पोहचण्यात मदत होते.मिडीयाच्या वापराचा फायदा देशाच्या प्रगतीसाठीही होत आहे असे मत मांडले.यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल बाविस्कर व सह कार्यक्रमाधिकारी प्रा.पाटील मॅडम यांनी वक्त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी शिबिरार्थी विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0