ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास व परिश्रमाची गरज - तालुका कृषी अधिकारी अजय वाढे..**दि न्यू इरा हायस्कूलमध्ये दहावी–बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..*. ‌ ‌‌. (अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान ) विद्यार्थ्यांना जीवनात ध्येयपूर्ती करायची असेल तर प्रत्येकाने आपला आत्मविश्वास वाढवून कठोर परिश्रम केले पाहिजे असे मौल्यवान मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी अजय वाढे यांनी स्थानिक दि.न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना केले...दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव जामोद येथे वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन बुधवार, 21 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात करण्यात आले होते... शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील हा एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुळकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा तालुका कृषी अधिकारी बुलढाणा अजय नामदेव वाढे हे उपस्थित होते. तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकारराव तायडे व पर्यवेक्षक प्रा. सुहास वाघमारे हे मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या प्रयोगशाळेसाठी आवश्यक वैज्ञानिक उपकरणे व रसायने तसेच ग्रंथालयासाठी उपयुक्त शैक्षणिक व संदर्भ पुस्तके भेट देण्यात आली. ही भेट विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, कृतज्ञता आणि ऋणानुबंध जपण्याची भावना दर्शविणारी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शेख सलीम यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची प्रमुख अतिथी यांचा परिचय तसेच सराव परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रमुख अतिथी तथा शाळेचे माजी विद्यार्थी अजय नामदेव वाढे तालुका कृषी अधिकारी बुलढाणा यांनी विद्यार्थ्यांना आगामी दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन केले...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश गिऱ्हे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. भुजबळ यांनी केले....

ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास व परिश्रमाची गरज - तालुका  कृषी अधिकारी अजय वाढे..**दि न्यू इरा हायस्कूलमध्ये दहावी–बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..*.                      ‌ ‌‌.                                                   
Previous Post Next Post