*भद्रावतीत प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.21 : विश्वकर्मा सुतार (झाडे) समाज, शाखा भद्रावती अंतर्गत प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी विश्वकर्मा सुतार (झाडे) समाज भवन, अभिषेक मंगल कार्यालयाजवळ, गुरु नगर, भद्रावती येथे आयोजित करण्यात आला आहे.या जयंती उत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता समाज ध्वजाचे ध्वजारोहण होणार असून हे ध्वजारोहण उत्सव समितीचे अध्यक्ष सौ. तेजश्री धनंजय निलवकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानंतर प्रतिमापूजन व देवदेवतांचे पूजन करण्यात येईल.सकाळी १० वाजता अल्पोपहार व चहा, तर १०.३० वाजता भजन आराधना आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता दहीहंडी व गोपाळकाला कार्यक्रम होणार असून यामध्ये जगन्नाथ बाबा भजन मंडळ, शिवाजी नगर, भद्रावती सहभागी होणार आहे.दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत मोफत शारीरिक तपासणी शिबिर (बॉडी फॅट चेकअप) तसेच आरोग्य सल्लागार सेवा (अमित बुच्चे, आकांक्षा बुच्चे) देण्यात येणार आहे. यानंतर महिलांसाठी हळदी-कुंकू व मनोरंजन कार्यक्रम, तसेच १ मिनिट उत्स्फूर्त स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.दुपारी २.३० वाजता पाहुण्यांचे मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमास आमदार मा. श्री. करण संजयजी देवतळे, नगराध्यक्ष मा. श्री. प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष मा. श्री. अनिलभाऊ धानोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. तेजश्री धनंजय निलवकर राहणार आहेत.सायंकाळी ५ ते ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात समाजातील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली सुधीर राऊत व सौ. दिपाली जयंत बोरकर करणार आहेत.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समिती व समाज बांधवांनी सहकार्य करावे व कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0