वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, शंकर महाजन यांचा नागरी सत्कार. (मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड) नांदेड :बिलोली शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी बिलोली येथील शासकीय विश्रामगृहात, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमात शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, मार्केट कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपीपळीकर, कमलाकर जमदडे, त्र्यंबक पाटील सावळीकर, विजय होपळे, विठ्ठल चंदनकर, धम्मानंद गावंडे, नगरसेवक संदीप कटारे, शंकर हांडे, रंजीत मंगरुळे, लखन हांडे, उपसभापती शंकर मामा यंकम, प्रकाश पाटील बडूरकर आदी मान्यवरांच्या वतीने मा. शंकर महाजन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना मा. शंकर महाजन यांनी पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत, बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी, संविधानाच्या मूल्यांसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी मा. शंकर महाजन यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.सदर सत्कार समारंभ मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत शांततापूर्ण व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0