पीएमश्री. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन- प्रतिभा व जल्लोषाचा संगम*. हिंगणघाट नगरपरिषद हिंगणघाट द्वारे संचालित पीएमश्री. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव आणि संपूर्ण शाळा परिसरात उत्साह, आनंद, आणि ऊर्जेचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती पल्लवी बाराहाते, नगरसेविका दुर्गा चौधरी, प्रशासन अधिकारी प्रवीण काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैशाली चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक सांघिक लोकनृत्य, एकल नृत्य, एकांकिका, नाट्यछटा आदी सादर केल्या. यावेळी नगराध्यक्षा नयना तुळसकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करुन भविष्यासाठी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा यासारख्या कृती विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात असे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गिरीधर कोठेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार संचालन शेषराव म्हैस्के यांनी केले. शाळेच्या वतीने सर्व पाहुण्यांचे आभार कविता चव्हाण यांनी मानले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वैशाली भडे, संजय पुनवटकर, प्रियंका गावंडे, ज्ञानेश्वर राऊत,माधवी वैरागडे, मंगेश कटारे, नम्रता मानकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक चंद्रशेखर कोठेकर, मिना आडकीने, सरिता केशवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0