कुसुमाग्रज प्रतिष्ठान याठिकाणी कविराज राधेशाम अशोक कंडारे यांना काव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या मंचाच्या नाशिक शाखेच्या वतीने आज झालेल्या संमेलनाचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात करण्यात आले आहे. या समरसता संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द कीर्तनकार आणि कवी ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ कवयित्री सौ. हेमलता गिते यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाची संयोजन समिती व संयोजक श्री. शिवराज पाटील हे आहेत.विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा यांच्या कडुन हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 51 कवींची निवड करण्यात आली असुन त्यांना गौरवपदक, महावस्त्र, श्रीफळ व मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.कवी-लेखकांचा खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाचा विषय "मराठी साहित्याने मला काय दिले?" असा आहे. या संमेलनाच्या समारोप सत्रात "कविमनाची आरोळी .... विश्वात्मक चारोळी" अशी उत्स्फुर्त चारोळी सादरीकरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.काव्यरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वडती गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील नागरिक, पुज्य साने गुरुजी माध्य.विद्यालय वडती येथील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, व मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post