*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला )वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी*. (मानवत / प्रतिनिधी.*)————————————*. मानवत* तालुक्यातील ताडबोरगाव गटात वंचित बहुजन आघाडी कडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* तपासणीत चुकीचा निघाल्याने यूवा उमेदवाराला आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी आली आहे. उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत करणार असल्याची चर्चा सुरु आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मानवत तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, सहाय्यक निवडणूक अधिकारी पांडुरंग माचेवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननी दरम्यान ताडबोरगाव गटातून विनोद मकासरे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* ताडबोरगाव *गटा* ऐवजी ताडबोरगाव *गणाचा* जोडला यामुळे विनोद मकासारे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात भरण्यात आल्याने अर्ज वैध ठरवण्यात आला असल्याने *विनोद मकासरे* यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यां मध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. असे असले तरी *विनोद मकासरे* यांना पक्षाकडून पुरस्कृत केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान तालुक्यातील उर्वरित तीन गटात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत.***

ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला )वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी*.                   
Previous Post Next Post