एकाच नंबर प्लेटवर दोन ट्रक! वाळू तस्करांचा नवा फंडा उघड....................................... सेलू पोलिसांची धडक कारवाई; 75.21 लाखांचा मुद्देमाल जप्त वर्धा जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, एकाच वाहन क्रमांकाचा वापर करून दोन वेगवेगळे ट्रक चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सेलू पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 75 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या अवैध वाळू व्यवसायामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सेलू पोलीस स्टेशनच्या पथकाने विश्राम विद्यालय परिसरात नाकाबंदी केली होती. दरम्यान, संशयास्पद अवस्थेत उभे असलेले दोन ट्रक पोलिसांच्या निदर्शनास आले.तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघड झाली की, दोन्ही ट्रकवर एकाच क्रमांकाची नंबर प्लेट लावण्यात आली होती. ‘एक नंबर – दोन ट्रक’ असा प्रकार पाहून पोलिसही चक्रावले. अधिक चौकशीअंती ही नंबर प्लेट मजबूत बनावटीची (डुप्लिकेट) असल्याचे तसेच तिचा वापर अवैध वाळू वाहतुकीसाठी केला जात असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी पोलिसांनी इरशाद खान अलेक्झांडर खान पठाण (वय 55) व अमित लीलाधर कुरके (वय 55) या दोघांना ताब्यात घेतले असून, ते या अवैध वाळू तस्करीचे मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे.पोलिसांनी कारवाईदरम्यानदोन वाळूने भरलेले ट्रकमजबूत बनावटीच्या (डुप्लिकेट) नंबर प्लेटबनावट कागदपत्रेअसा एकूण 75,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सेलू पोलिसांकडून सुरू आहे.या प्रकरणामागे मोठे वाळू तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या नेटवर्कमधील इतर आरोपी व वाहन मालकांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा MEDIA POLICE TIME विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0