वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण, जिल्हा अध्यक्षपदी शंकर महाजन. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड :दि. 8/1/2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते,शंकर गंगाधर महाजन यांची. नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असे निवडीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण यांनी दिली आहे, शंकर महाजन यांच्या जिल्हा अध्यक्षपदी निवडीचे सर्व कार्यकर्त्यांकडून त्यांचं, बिलोली तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, व नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्ते शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,शंकर महाजन साहेब हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे विश्वासू असून,बसव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष,अविनाश भाऊ भोसीकर यांचे खांदे समर्थक व शिवभाऊ नरंगले यांचे समर्थक आहेत, व बसव ब्रिगेड नांदेड जिल्हा संघटक आहेत, गेल्या 10 ते 15 वर्षापासून सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेण्याचे कार्य शंकर महाजन यांनी केले आहे, त्यांनी तळागाळातील, गोरगरिबांना, न्याय देण्याचं काम बिलोली तालुक्यात व नांदेड जिल्ह्यामध्ये, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून केलेली आहे,लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून बिलोली तालुक्यामध्ये त्यांची मोठी ओळख आहे, अशा सामान्य माणसाची जाणीव असणारा व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा,आणि पक्ष संघटन मजबूत करणारे,एक नेतृत्व नांदेड जिल्ह्याला लाभलेला आहे असे,वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया मिळत आहेत,आदरणीय बाळासाहेबांनी शंकर महाजन यांना जिल्हा अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांचे सुद्धा शंकर महाजन यांच्याकडून धन्यवाद दिले असून, साहेबांनी दिलेली ही जिम्मेदारी नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षाचा मोठा विस्तार करून, पक्ष मजबूत व ताकतवान बनवण्याचे कार्य जिल्हा सहकारी,सर्व माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करणार, व कार्यकर्त्यांना सत्तेत भागीदारी देणार, असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन यांनी, व्यक्त झाले त्यांच्या या निवडीने, कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0